⚡मालवण ता.२५-:
मालवण येथील ग्रामीण रुग्णालय येथे आज ‘जागतिक हिवताप दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित कर्मचारी आणि नागरिकांना राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाविषयी सविस्तर माहिती देऊन जनजागृती करण्यात आली. तसेच आरोग्य विषयक महत्त्वाचे मार्गदर्शनही करण्यात आले.
या प्रसंगी रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. डी. पोळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमित मोडक, डॉ. मेहेंदळे, आरोग्य निरीक्षक व्ही. पी. सावंत, आरोग्यसेवक एस. ए. चांदेरकर यांसोबतच श्रीमती प्रभू, श्रीमती वेंगुर्लेकर, श्री. मगर, श्रीमती कुबल, श्रीमती संतोषी देसाई, श्री. केळुसकर आणि इतर आरोग्य कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाद्वारे परिसरात हिवताप निर्मूलनासाठी जनजागृती करण्यात आली.
ग्रामीण रुग्णालय येथे ‘जागतिक हिवताप दिन’ उत्साहात साजरा…
