दोडामार्गमध्ये पाणीटंचाई तीव्र…

बाबुराव धुरी :नळपाणी योजना विस्कळीत..

⚡दोडामार्ग ता.२७-:
तालुक्यातील अनेक गावांमध्ये नळपाणी पुरवठा ठप्प झाल्याने पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. विहिरी व नैसर्गिक पाणीस्रोत आटल्यामुळे नागरिक, विशेषतः महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी पुढाकार घेत पाणीटंचाईग्रस्त नागरिकांना थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. संबंधित गावांची माहिती गोळा करून प्रशासनाकडे ठोस पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, टँकर सेवा सुरू करण्यासह तातडीच्या उपाययोजना न झाल्यास नागरिकांमध्ये रोष वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page