पुरस्कारातून नवी प्रेरणा देण्याचे अविष्कार फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद…

प्रा. कैलास राबते :अविष्कार फाउंडेशनतर्फे विविध पुरस्कारांचे वितरण..

मालवण ता.२६-:
अविष्कार फाउंडेशन हि संस्था महाराष्ट्रात जे काम करत आहे त्यास तोड नाही. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार यांनी या संस्थेद्वारे माणसे जोडण्याचे काम केले आहे. हि संस्था विविध क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देऊन त्यांना नवी प्रेरणा व स्फूर्ती देण्याचे काम करत आहे. पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी पुरस्कार मिळाल्यानंतरही आपले कार्य करत राहावे आणि सामाजिक बांधिलकी जोपासात पुढे जात राहावे, असे प्रतिपादन मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते यांनी येथे बोलताना केले.

सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या कोल्हापूर येथील आविष्कार सोशल अँड एज्यूकेशन फाउंडेशन इंडिया या संस्थेचा पुरस्कार वितरण सोहळा मालवण कुंभारमाठ येथील हॉटेल जानकी सभागृहात संपन्न झाला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य कैलास राबते हे बोलत होते. यावेळी व्यासपिठावर अविष्कार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय पवार, ज्येष्ठ साहित्यिक किसनराव कुऱ्हाडे, मंत्रालयातील सेवानिवृत्त लेखापाल काशिनाथ जाधव, सिंधुदुर्ग जि. प. चे माजी वित्त व बांधकाम सभापती जयेंद्र रावराणे, एम.डी. देसाई, झिलू गोसावी, आदी व इतर मान्यवर उपस्थित होते. संजय पवार यांनी प्रास्ताविक करत संस्थेच्या कार्याची माहिती दिली.

यावेळी विविध क्षेत्रातील व्यक्तींना अविष्कार फाउंडेशनतर्फे क्रांतिसूर्य जोतिबा फुले समाजभूषण, कलारत्न गौरव, गुणवंत शिक्षक, तसेच गुणवंत आरोग्य कर्मचारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यामध्ये मालवणमधील फुले शाहू आंबेडकर विचारमंचचे संस्थापक अध्यक्ष आणि सेवानिवृत्त गटविकास अधिकारी मिलिंद जाधव यांनाराज्यस्तरीय क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले समाजभूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. तसेच काशिनाथ जाधव (सेवानिवृत्त लेखापाल), नितीन जठार (कणकवली) यांनाही समाजभूषण पुरस्कार देण्यात आला. प्रा. नितीन जाधव (गारगोटी) राष्ट्रीय स्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवणचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. आर. एन. काटकर यांना शिक्षण सेवा कार्य गौरव पुरस्कार देण्यात आला. तर विनायक जाधव (कणकवली), बाबासाहेब मायंवर (करवीर कोल्हापूर), सुरेंद्र साळुंखे (वैभववाडी) यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार व स्नेहल गोसावी (करंजे कणकवली), शीतल गोसावी (निरूखे कुडाळ) यांना गुणवंत शिक्षिका पुरस्कार देण्यात आला.

विनोद राणे (परुळे वेंगुर्ला), महेश गोसावी (म्हापण वेंगुर्ला), रामचंद्र परब (डिगस कुडाळ), आत्माराम गोसावी (परुळे वेंगुर्ला), सोमा परब (पिंगुळी कुडाळ), महादेव नाईक (मोचेमाड), शंकर वालावलकर (वेतोरे) यांना कलारत्न गौरव पुरस्कार देण्यात आला. तसेच डॉ. शरद जाधव (वेंगुर्ला) यांना पशुवैद्यकीय सेवा कार्य गौरव पुरस्कार देण्यात आला. तर अशोक नारकर (कणकवली) व सुनील बागवे (कणकवली) यांना गुणवंत आरोग्य कर्मचारी पुरस्कार देण्यात आला.

यावेळी अध्यक्षीय भाषणात किसनराव कुऱ्हाडे म्हणाले, महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार वितरण सोहळा होत असल्याने मला आनंद आहे. अविष्कार फाउंडेशनचे पुरस्कार आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचले पाहिजेत, या पुरस्कारातून सर्वांनी प्रेरणा घ्यावी, संजय पवार हे उत्तम काम करत आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी जयेंद्र रावराणे यांनीही विचार मांडले. सूत्रसंचालन श्री. तांबे यांनी केले.

You cannot copy content of this page