Headlines

कणकवली शिवसेना शाखेत आज तिथीप्रमाणे शिवजयंती उत्साहात साजरी…

⚡सावंतवाडी ता.०६-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कणकवली येथील शिवसेना शाखेत आज मोठ्या उत्साहात तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज कि जय!, जय भवानी,जय शिवाजी! असा जयघोष करण्यात आला. शिवजयंती निमित्त दरवर्षीप्रमाणे श्री. सत्यनारायण महापूजा…

Read Full News

सावंतवाडीत ​मळगांव येथे १३ मार्चपासून ‘लोक-सिंधू महोत्सव २०२६’ सोहळा…

लोकमान्य मल्टीपर्पज को- ऑपरेटिव्ह सोसायटीचे आयोजन;कोकणची समृद्ध कला-संस्कृती व खाद्य परंपरेची रेलचेल.. ⚡​सावंतवाडी ता.०६-:कोकणची समृद्ध कला-संस्कृती, निसर्गसंपन्न पर्यटन आणि जिभेवर रेंगाळणारी पारंपरिक खाद्यसंस्कृती यांचा अनोखा संगम असलेल्या ‘लोक-सिंधू महोत्सव २०२६’ चे आयोजन १३ ते १५ मार्च या कालावधीत सावंतवाडीत करण्यात आले आहे. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, जय हिंद कॉलेज ऑफ सायन्स आणि माई इन्स्टिट्यूट…

Read Full News

आयुष्यात आलेली सर्व जळमटे आणि किल्मिषे बाजूला सारून आयुष्याला सामोरे जा…

साहित्यिका कल्पना बांदेकर :कट्टा येथील वराडकर हायस्कुलमध्ये मराठी भाषा दिन साजरा.. ⚡मालवण ता.०६-:आज काल आत्महत्या करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत खास करून तरुण-तरुणी आत्महत्येकडे “उपाय” म्हणून पहात असल्याने आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे मात्र सुंदर जीवन जगायचे असेल तर प्रत्येकाने आपल्या मधील कलेत गुंतून घेतले पाहिजे मग ती नाट्य कला असेल वाचन कला असेल आपल्यातील इतर…

Read Full News

शिवसेनेच्या वतीने कुडाळात ९ मार्चला ‘जागर स्त्री शक्तीचा’…

जागतिक महिला दिनाचे औचित्य:विविध स्पर्धाचे आयोजन.. कुडाळ : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आमदार निलेश नारायणराव राणे यांच्या संकल्पनेतून शिवसेना महिला सेना, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सोमवार दि. ९ मार्च २०२६ रोजी “जागर स्त्री शक्तीचा” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आले. येथील सिंधुदुर्ग राजा मैदानावर दुपारी ३ वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. या निमित्त महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे…

Read Full News

चिपळूण येथील डेरवण युथ गेम्स 2026 कॅरम स्पर्धेत साक्षी रामदुरकर विजेती…

⚡सावंतवाडी ता.०६-: डेरवण, चिपळूण येथील श्री.विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट आयोजित कॅरम स्पर्धेत सोळा वर्षाखालील मुलींच्या गटात सावंतवाडीतील मुक्ताई ॲकेडमीच्या साक्षी रामदुरकर हीने विजेतेपद मिळवले. महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील विदयार्थी या स्पर्धेत सहभाग घेतात. ट्रस्टतर्फे मागील बारा वर्षे कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. मुक्ताई ॲकेडमीचे विदयार्थी गेली नऊ वर्षे सातत्याने या स्पर्धेत सहभाग घेऊन पारितोषिके…

Read Full News

उज्ज्वला धानजी यांच्या”आठवणीच्या हिंदोळ्यावर” या पुस्तकाचे प्रकाशन…

⚡कुडाळ ता.०६-: बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कणकवली येथील सेवानिवृत्त रोखपाल आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण यांच्या आजीव सदस्या उज्ज्वला चंद्रशेखर धानजी यांच्या “आठवणींच्या हिंदोळ्यावर” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच नीलम कंट्रीसाईड कणकवली येथे संपन्न झाला. हे पुस्तक विघ्नेश पुस्तक भांडार कणकवली यांनी प्रकाशित केले आहे.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ए आय बी इ ए कोल्हापूर…

Read Full News

दारिस्ते येथे गडनदी पात्रातील गाळ उपसा कामाचा शुभारंभ…

⚡कणकवली ता.०६-: दारिस्ते येथील गडनदी पात्रातील गाळ उपसा कामाचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संदेश सावंत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. गडनदी पात्रात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे पावसाळ्यात पुराचे पाणी गुरववाडी वस्तीत घुसत असे. त्यामुळे ग्रामस्थांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होत होता. तसेच उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी उपलब्ध होत नसल्याने…

Read Full News

आरोस विद्या विकास हायस्कूल मध्ये शिवकालीन साधनांचे प्रदर्शन…

महाराजांचा इतिहास जीवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिवप्रेमींच कार्य कौतुकास्पद; सीताराम गावडे.. ⚡ओरोस ता.०५-: विद्यार्थ्यांना शिवकालीन इतिसाची माहिती व्हावी व आपला शिवकालीन इतिहास जिवंत रहावा यासाठी शिवप्रेमी मोठी मेहनत घेताना दिसत आहेत.शाळेतील विद्यार्थ्यांना शिवकालीन साधनांची (शस्त्रांची) माहिती व्हावी या उद्देशाने ,आरोस विद्या विकास हायस्कूल मध्ये एक दिवसीय शिवकालीन साधनांच प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.या प्रदर्शनाला प्रमुख…

Read Full News

चिंदरमध्ये झाडाऐवजी फांदीची होळी…

सडेवाडीतील ग्रामस्थांचा आदर्श उपक्रम.. ⚡मालवण ता.०५-:अलिकडच्या काळात वृक्षतोडीचे वाढते प्रमाण लक्षात घेता, मालवण तालुक्यातील चिंदर येथील सडेवाडीतील ग्रामस्थांनी पर्यावरणाप्रति आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक आदर्श पायंडा घालून दिला आहे. चिंदर सडेवाडीतील गोसावीवाडी, हडकरवाडी, देवकोंडवाडी आणि गोलाकरवाडी या चारही वाड्यांच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी पूर्ण झाड तोडण्याऐवजी केवळ झाडाची ‘फांदी’ वापरून होळी साजरी करण्यात आली. चिंदर-सडेवाडी…

Read Full News

मालवणात ८ रोजी महिलांसाठी पाककला आणि खेळ पैठणीचा स्पर्धा…

नगरपालिका महिला व बालकल्याण समितीतर्फे आयोजन.. ⚡मालवण ता.०५-:जागतिक महिला दिनानिमित्त मालवण नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने मामा वरेरकर नाट्यगृह येथे दि. ८ मार्च रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ६ या वेळेत वाजेपर्यंत जागतिक महिला दिन कार्यक्रम व मालवण शहर मर्यादित महीला व मुलींकरिता पाककला आणि खेळ पैठणीचा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पाककला स्पर्धेसाठी नाचणी…

Read Full News

You cannot copy content of this page