आंबडोस येथील रवळनाथ मंदिराचा ६ रोजी वर्धापन दिन…

⚡मालवण ता.०१-:
मालवण तालुक्यातील आंबडोस येथील श्री देव रवळनाथ मंदिराचा आठवा वर्धापन दिन सोहळा बुधवार दि. ६ मे रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ९.३० वाजता लघुरुद्र, दुपारी १२.३० वाजता आरती, १ ते ३ या वेळेत महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजता सत्यनारायण महापूजा, ६ वाजता महाआरती, ६.३० वाजता भजने, ७.१५ वाजता बुवा-अमित डिचवलकर यांचे भजन, रात्री ९.३० वाजता पालखी प्रदक्षिणा, १०.३० वाजता बार्का सावंत दशावतार नाट्य मंडळ, असरोंडीचा नाट्यप्रयोग होणार आहे. सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page