वजराट श्री देव गिरेश्वर – श्री देवी सातेरी मंदिर येथे 2 व 3 मे रोजी धार्मिक कार्यक्रम…

⚡वेंगुर्ला ता.०१-: तालुक्यातील वजराट ग्रामदैवते श्री देव गिरेश्वर आणि श्री देवी सातेरी मंदिराच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शनिवार दि. २ मे आणि रविवार दि. ३ मे या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी ८.३० वाजता श्री देव गिरेश्वर आणि श्री देवी सातेरी तसेच इतर पंचायतनांवर अभिषेक,
सकाळी १० वाजता श्री सत्यनारायण महापूजा,
दुपारी १२:३० वाजता महाआरती आणि तीर्थप्रसाद,
दुपारी १ ते ३ वा. महाप्रसाद,
सायंकाळी ४ वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ग्रामस्थांचे सुस्वर भजन, महिलांची आकर्षक फुगडी,
रात्री ८.३० वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा गावची गौरवलेली दिंडी (प्रति पंढरपूर) : सुप्रसिद्ध बुवा लवू घाडी आणि सहकारी खास आकर्षण श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन (संत समागम), श्री स्वामी समर्थ, श्री साईबाबा, श्री गजानन महाराज आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे साक्षात दर्शन सादर होणार आहे. रविवारी
रात्री ८.३० वाजता श्री ओंकार पारंपरिक लोककला दशावतार नाट्य मंडळ म्हापण, ता.वेंगुलां यांचे
‘सती चंद्रसेना अर्थात अही-मही रावण’ हे महान पौराणिक नाटक सादर होणार आहे. भाविकांनी सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे असे आवाहन गावप्रमुख सूर्यकांत पुं. परब यांनी केले आहे.

You cannot copy content of this page