प्रमोद जठार यांच्या निवडीमुळे कोकणातील विकासकामांना गती मिळेल…

रवींद्र चव्हाण: पुष्पगुच्छ देऊन केले अभिनंदन; विशाल परब यांची उपस्थिती..

⚡सावंतवाडी ता.०१-: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. प्रमोद जठार यांची विधानपरिषद आमदारपदी निवड होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब उपस्थित होते. प्रमोद जठार यांच्या निवडीमुळे कोकणाला आणखी एक सक्षम प्रतिनिधित्व मिळणार असून, यामुळे कोकणातील विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केलीआहे.
दरम्यान, जठार यांच्या निवडीमुळे कोकणात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वगुणांचा फायदा राज्याच्या तसेच कोकणाच्या प्रगतीसाठी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

You cannot copy content of this page