सावंतवाडी नगरपरिषदेसमोर सुरू असलेले श्रेयस मुंज यांचं उपोषण तात्पुरत स्थगित…

सावंतवाडी : शहरातील विविध प्रश्नांबाबत नगरपरिषद प्रशासनाच्या विरोधात उपोषणाला बसलेले माठेवाडा येथील श्रेयस साईनाथ मुंज यांनी आपले उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे, अशी माहिती मुंज यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.
मुंज यांनी निवेदनात म्हटले आहे की, आज उपोषण पुकारल्यानंतर माजी आमदार दीपक केसरकर तसेच नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांच्याशी चर्चा झाल्याने हा निर्णय घेण्यात आला.
या चर्चेच्या परिणामी ८ मे रोजी संबंधित विषयावर बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे मुंज यांनी आपले उपोषण ८ मे पर्यंत स्थगित ठेवल्याचे लेखी निवेदनात नमूद केले आहे. मात्र, सदर बैठकीत योग्य तो तोडगा न निघाल्यास पुढील उपोषण पुन्हा सुरू करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. उपोषणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी आमदार व नगरपरिषद प्रशासनाची राहील, असेही त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.

You cannot copy content of this page