पत्रादेवी चेकपोस्टवर सव्वा तीन लाखांची दारु पकडली
*ð«बांदा दि.१६-:* मुंबई गोवा महामार्गावर गोव्यातून मुंबईच्या दिशेने घेऊन जात असलेल्या गोवा बनावटीच्या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात पत्रादेवी एक्साइज चेकपोस्टवर अबकारी खात्याने कारवाई केली. या कारवाईत ३ लाख २० हजार रुपयांच्या दारुसह १ लाख ८० हजारांचा टेम्पो असा एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी गिरीश डी. जोशी (४५, रा. ठाणे)…
