माऊली कला क्रीडा मंडळातर्फे स्पर्धेचे आयोजन
सावंतवाडी : मळेवाड येथील माऊली कला क्रीडा मंडळातर्फे भव्य अशी रस्सीखेच स्पर्धा १९ डिसेंबर रोजी मळेवाड-कोंडुरे ग्रामपंचायत नजीक आयोजित केली आहे. प्रथमच मळेवाड येथे ही स्पर्धा आयोजित करून क्रीडा रसिकांना एक प्रकारे या मंडळाने मेजवानीच दिली आहे. ही स्पर्धा सहाशे वजनी गटात होणार असून या स्पर्धेची ५०० रुपये प्रवेश फी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांच पालन करून ही स्पर्धा होणार असून, सर्व क्रीडा रसिक, स्पर्धकांनी कोरोनाविषयी नियमांचे पालन करून हि स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन मंडळाने केले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५ हजार रूपये व चषक, द्वितीय पारितोषिक ३ हजार रूपये व चषक तसेच बेस्ट फ्रंट मॅन ५०० रूपये, बेस्ट लास्ट मॅन ५०० रूपये अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तरी स्पर्धकांनी व क्रीडा रसिकांनी या स्पर्धेचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.