जोपर्यंत शासन निर्णय होत नाही,तोपर्यंत मुलांना शाळांमध्ये बोलावू नये-दिलीप तळेकर

सर्व शिक्षकांची आर्टिपीसीआर तपासणी करावी;मुले पॉझिटिव्ह झाल्यास जबाबदारी कोण घेणार?

*💫कणकवली दि.१६-:* मुले कोरोना पॉझिटिव्ह झाल्यास मोठी अडचण होईल.त्यामुळे शासन निर्णय होत नाही,तोपर्यंत चुकीच्या पद्धतीने शाळा नको.५० टक्के शिक्षक उपस्थित योग्य आहे.तालुक्यातील सर्व शिक्षकांची आर्टिपीसीआर तपासणी करावी.त्यांनतरच पालकांशी शिक्षकांनी संवाद साधावा.जोपर्यंत शासन निर्णय होत नाही,तोपर्यंत कणकवली तालुक्यातील मुलांना शाळांमध्ये बोलावू नये,अशी भूमिका सभापती दिलीप तळेकर यांनी स्पष्ट केला. कणकवली पंचायत समिती सभापती दालनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.उपसभापती दिव्या पेडणेकर,गटशिक्षणाधिकारी अरुण चव्हाण,गटशिक्षणाधिकारी संदेश किजवडेकर,भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, ओटव सरपंच हेमंत परुळेकर आदी उपस्थित होते. कोरोना संकट कमी होत असताना पुन्हा रुग्ण वाढत आहे.लॉकडाऊन काळात कणकवली तालुक्यातील २३ जूनला शिक्षण आपली दारी हा चांगला उपक्रम राबविला.तो उपक्रम ७ ऑक्टोबरला उपक्रम थांबवला.आता शासन निर्णयानुसार ५० टक्के शिक्षक उपस्थिती असायला हवी.कोरोना रुग्ण वाढायला लागले.कणकवली तालुक्यातील ८ दिवसांत ५ शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत. शासन परिपत्रक येत नाही तोपर्यंत शाळा सुरु करू नयेत.मुले पॉझिटिव्ह झाल्यास जबाबदारी कोण घेणार?असा सवाल दिलीप तळेकर यांनी केला आहे. कालचे शिक्षनाधिकारी यांचे पत्र आहे.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रथम पालकांनाही संपर्क साधावा.यापूर्वी शासन निर्णय देखील तसाच आहे.आता नववी ते १२ वीच्या शाळा सुरु होताना सर्वांच्या चाचण्या झाल्यात.त्याच प्रमाणे प्राथमिक शिक्षकांची कोणत्याही प्रकारची चाचणी नाही.माध्यमिक शिक्षकांची आर्टिपीसीआर तपासणी झाली,तशीच तपासणी व्हावी,अशी मागणी दिलीप तळेकर यांनी केली आहे.

You cannot copy content of this page