*सावंतवाडी जिमखाना परिसरात चार दिवसांपूर्वी घडली होती घटना
*💫सावंतवाडी दि.१६-:* कोल्हापूरहुन सावंतवाडीकडे माल घेऊन येणाऱ्या टेम्पो चालकावर लूटमारीच्या उद्देशाने पहाटे जीवघेणा हल्ला चार दिवसापूर्वी जिमखाना मैदान परिसरात घडला होता. त्यानंतर त्या जख्मी टेम्पो चालकाला अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलवण्यात आले होते. परंतु त्या टेम्पो चालकाचा उपचारादरम्याने मृत्यू झाला असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकाकडून प्राप्त झाली आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, न्यायलयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.