*💫सिंधुदुर्गनगरी-:* : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अधिकारी बदलले की नवबौद्धांना न्याय देण्याच्या वेळीच नियम बदलतात का? उदाहरणार्थ न्हानू सरमळकर, याप्रकरणी दिनांक 10 नोव्हेंबर पासून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर बेमुदत घंटानाद आंदोलन सुरू केल्यानंतर मा.उपायुक्त कोकण यांनी पाठवलेले दिनांक २७ जून २०१९ च्या पत्रानुसार तब्बल १ वर्ष ६ महिन्यांनी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर साहेब दिनांक १० नोंव्हेंबर २०२० ला कळवितात की, सरमळकर यांना शासनाचे खडसे नावाचे सचिव १८ आक्टोबर १७ ला म्हणतात ४/८ च्या निर्णयाला स्थगिती आहे, तेच सचिव २९ डिसेंबर १७ ला म्हणतात स्थगिती नाही. ते शासनाचे पत्र नागपूर मॅटने सदोष ठरवले त्या शासनाच्या पत्राचा आधार घेऊन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर साप्रविचे पदोन्नती आदेश काढू शकतात, तर मग १० डिसेंबर २० चे पत्रावर सही करताना मुलेविअ गौतम जगदाळे, उपमुख्य लेखाधिकारी विशाल पवार, पर्यवेक्षक सहाय्यक लेखाधिकारी चिंदरकर, लेखाधिकारी व्ही डी आरोंदेकर आणि हे कार्यासन सांभाळणारे वरिष्ठ सहाय्यक विनय प्रभू कडे दिनांक १ सप्टेंबरमध्ये शासनाच्या नियमानुसार पदोन्नतीसाठी पात्रतेनुसार निवड यादीची मागणी का करु शकले नाहीत, त्या यादीनुसार पदोन्नती समितीची बैठक का घेऊ शकले नाहीत ? २) आम्ही आंदोलन केल्यानंतरच, आम्ही लेखी मागणी केल्यानंतरच सरमळकर यांना बॅकडेटने प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी ४५ वय सुट दिल्याचा आदेश दिनांक १जानेवारीला सही करुन तब्बल १ महिन्याने म्हणजे च १फेब्रुवारीला आऊटवर्ड करतात. तो आदेश काढतांना सलेअची रिक्त पदे असतांना, पदोन्नतीसाठी सरमळकर पात्र असतांना पदोन्नती का दिली नाही? गटविकास अधिकारी पंचायत समिती वेंगुर्ला यांना तो आजपर्यंत का पाठविला नाही? सरमळकरला का दिला नाही? अशा अनेक चुका दडपण्याचा प्रयत्न होत तर नाही ना ? म्हणूनच आम्ही विचारले आहे की, अधिकारी बदलले की नियम बदलतात का ? म्हणून च दिनांक १५ डिसेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कुडाळ तहसीलदार अमोल फाटक यांच्या मार्गदर्शनानुसार कार्यालयीन वेळेत घंटानाद आंदोलन आणि कार्यालयीन वेळेनंतर ढोलांच्या गजरात आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा आजचा ३७ दिवस. आजच्या आंदोलकांनामध्ये श्री मनोरमा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष मा. दयानंद चौधरी घंटा वाजविताना छायाचित्रात दिसत आहेत. रावजी गंगाराम यादव जिल्हाध्यक्ष दि बुध्दीष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौध्द महासभा शाखा सिंधुदुर्ग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा सिंधुदुर्ग
*१० नोव्हेंबर पासून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर सुरू असलेले बेमुदत घंटानाद आंदोलन अजूनही सुरूच
