उत्पादन शुल्क अधिकाऱ्यास धक्काबुक्की केल्याप्रकरणी तिघांना २ दिवसाची पोलीस कोठडी

*💫सावंतवाडी दि २३-:* बेकायदा दारू वाहतूक करताना उत्पादन शुल्क खात्याच्या विशेष कृती दलाचे निरीक्षक पांडुरंग पाटील यांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी अटकेत असलेल्या तीन संशयित आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता न्यायलयाने २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपींच्या वतीने अँड संग्राम देसाई आणि पंकज आपटे यांनी काम पाहिले आहे.

Read More

रोणापालमधील ‘त्या’ रस्त्याचा प्रश्न गुंतागुंतीचा!

*💫बांदा दि.२३-:* रोणापाल मुख्य रस्ता ते खेरकटवाडी, भरडवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यासंदर्भात सावंतवाडी तहसीलदारांची शिष्टाई अयशस्वी झाली. स्थानिक ग्रामस्थ व जमीनमालक यांच्यात जोरदार शाब्दिक बाचाबाची झाल्याने रस्त्याचा प्रश्न अाणखीनच गुंतागुंतीचा बनला आहे. बुधवारी पुन्हा जमीनमालक व स्थानिकांची एकत्रित बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी स्थानिकांना दिले. रोणापाल खेरकटवाडी, भरडवाडी रस्त्यासाठी ग्रामस्थांनी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर…

Read More

आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी

सावंतवाडी : तालुक्यातील डिंगणे कोतवाल संतोष राजाराम नाईक यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्या प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या दोन्ही संशयित आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर यातील एक आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणी अँड. शोएब डिंगणकर यांनी काम पाहिले आहे.

Read More

सिंधुदुर्ग सुशिक्षित विद्यूत अभियंता संघटना स्थापन…

*💫कणकवली दि.२३-:*  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुशिक्षित विद्यूत अभियंता संघटना आज स्थापन करण्यात आली.या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी श्री.कल्पेश सुरेश सुद्रीक यांची माहुमताने निवड करण्यात आली आहे.तर सचिव पदी प्रथमेश नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे.आणि खजिनदार पदी कृष्णा तेली यांची निवड करण्यात आली आहे. या निवडी वेळी श्री.अमित धुमाळे,नितीश पाटील ,अक्षय गवस ,उमेश पताडे ,प्रसाद नार्वेकर ,भोगटे,दळवी,…

Read More

आरोस येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव उत्साहात

*💫सावंतवाडी दि.२३-:* सावंतवाडी तालुक्यातील आरोस येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमावलीचे पालन कस्र उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी मंदिरातील धार्मिक विधी, त्यानंतर ओटी भरणे, नारळ, केळी ठेवणे गाºहाणे घालणे आदी कार्यक्रम पार पडले. भाविक भक्तांनी रांगेत राहून सोशल डिस्टन्सिंंग पाळून देवीचे दर्शन घेतले. जत्रोत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली…

Read More

मळेवाड येथील खुल्या रस्सीखेच स्पर्धेत प्रणाली स्पोर्टस मळेवाड विजेता

*सिद्धेश्वर दाळकर तळवडे उपविजेता *💫सावंतवाडी दि.२३-:* मळेवाड येथील माऊली कला क्रीडा मंडळाच्यावतीने शनिवारी मळेवाड येथे झालेल्या खुल्या रस्सीखेच स्पर्धेत प्रणाली स्पोर्टस मळेवाड संघ विजेता तर सिद्धेश्वर दाळकर तळवडे संघ उपविजेता ठरला. स्पधेर्चे उदघाटन जेष्ठ नागरीक बाबल नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर बाबल नाईक, गुरुप्रसाद नाईक, रमाकांत नाईक, हेमंत मराठे, नंदू नाईक,…

Read More

ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजताच भाजपच्यावतीने मोर्चेबांधणीस सुरुवात

गोठोस-निळेली ग्रुप ग्रामपंचायत काबित करण्यासाठी प्रयत्न *💫कुडाळ दि.२३:-* राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजताच भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गोठोस-निळेली ग्रुप ग्रामपंचायत काबित करण्यासाठी कंबर कसली आहे. पक्षाचे पदाधिकारी पक्षबांधणीसाठी ग्रामपंचायतीवर सत्ताकाबीज करण्यासाठी मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. काल रात्री गोठोस- निळेली ग्रूप ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी संदर्भात प्रकाश मोर्ये व जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष दिनेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली श्री‌.मोर्ये…

Read More

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांचे आमदार नितेश राणे यांनी केले सांत्वन…

*💫कुडाळ दि.२३-:* भाजपचे युवा आमदार नितेश राणे यांनी आज शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या मुलाचे आकस्मिक निधन झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, प्रांतिक सदस्य सुरेश सावंत,…

Read More

जिल्ह्यात आज 10 जण कोरोना पॉझिटीव्ह

सक्रीय रुग्णांची संख्या 355;जिल्हा शल्य चिकित्सक *💫सिंधुदुर्गनगरी दि२३-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 5 हजार 278 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 355 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 10 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक शीमत चव्हाण यांनी दिली.

Read More

मुंबई गोवा महामार्गावर जाणवली येथील अपघातात युवक ठार…

*💫कणकवली दि.२३-:* मुंबई गोवा महामार्गावर जाणवली कलमठ येथे मंगळवारी रात्री झालेल्या अपघातात एक युवक ठार झाला आहे. बाबाजी उर्फ बाळा नांदगावकर (वय २७) असे त्या युवकाचे नाव आहे. डायवर्षन करण्यासाठी लावण्यात आलेल्या पत्र्याला दुचाकी धडकून हा युवक ओहोळात पडून गंभीर जख्मी झाला होता. यावेळी झालेल्या मोठ्या आवाजाने तेथे जमलेल्या नागरिकांनी त्याला रिक्षातून उपजिल्हा रुग्णालयात दाखल…

Read More
You cannot copy content of this page