मुंबई गोवा महामार्गावर जाणवली येथील अपघातात युवक ठार…

*💫कणकवली दि.२३-:* मुंबई गोवा महामार्गावर जाणवली कलमठ येथे मंगळवारी रात्री झालेल्या अपघातात एक युवक ठार झाला आहे. बाबाजी उर्फ बाळा नांदगावकर (वय २७) असे त्या युवकाचे नाव आहे. डायवर्षन करण्यासाठी लावण्यात आलेल्या पत्र्याला दुचाकी धडकून हा युवक ओहोळात पडून गंभीर जख्मी झाला होता. यावेळी झालेल्या मोठ्या आवाजाने तेथे जमलेल्या नागरिकांनी त्याला रिक्षातून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु गंभीर जख्मी असल्याने त्याला लाईफ टाईम हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी नेण्यात येत होते. परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

You cannot copy content of this page