निरवडे-श्री देव सातपाटेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव उत्साहात

*💫सावंतवाडी दि.२३-:* निरवडे येथील जागृत देवस्थान श्री देव सातपाटेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमावलीचे पालन करून उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त देवाला केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे- फेडणे आदी कार्यक्रम पार पडले. त्यानंतर रात्री सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाने ‘रक्तचंडी’ हा पौराणिक नाट्यप्रयोग सादर केला आहे. निरवडे परिसरातील भाविकांनी शासनाचे नियम पाळून जत्रोत्सवाचा व नाट्यप्रयोगाचा लाभ घेतला.

You cannot copy content of this page