सावंतवाडी : तालुक्यातील डिंगणे कोतवाल संतोष राजाराम नाईक यांच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्या प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या दोन्ही संशयित आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर यातील एक आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणी अँड. शोएब डिंगणकर यांनी काम पाहिले आहे.
आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या दोन्ही संशयित आरोपींना न्यायालयीन कोठडी
