*💫कुडाळ दि.२३-:* भाजपचे युवा आमदार नितेश राणे यांनी आज शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या मुलाचे आकस्मिक निधन झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गोट्या सावंत, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, प्रांतिक सदस्य सुरेश सावंत, महिला जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेविका संध्या तेरसे, कुडाळ नगराध्यक्ष ओंकार तेली, उपनगराध्यक्ष आबा धडाम, सुनील बांदेकर, राकेश कोदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांचे आमदार नितेश राणे यांनी केले सांत्वन…
