आरोस येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव उत्साहात

*💫सावंतवाडी दि.२३-:* सावंतवाडी तालुक्यातील आरोस येथील श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमावलीचे पालन कस्र उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी मंदिरातील धार्मिक विधी, त्यानंतर ओटी भरणे, नारळ, केळी ठेवणे गाºहाणे घालणे आदी कार्यक्रम पार पडले. भाविक भक्तांनी रांगेत राहून सोशल डिस्टन्सिंंग पाळून देवीचे दर्शन घेतले. जत्रोत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. जागृत देवस्थान असून भक्तांची इच्छा पूर्ण करणारी देवता म्हणून श्री देवी माऊलीकडे पाहिले जाते. सजवलेल माऊलीच रूप तेजोमय अस दिसत होत रात्री वालावलकर दशावतारी नाट्य मंडळाने पौराणिक नाट्य प्रयोगसादर केला. परिसरातील भाविकांनी शासनाचे नियम पाळून जत्रोत्सवाचा लाभ घेतला.

You cannot copy content of this page