मळेवाड येथील खुल्या रस्सीखेच स्पर्धेत प्रणाली स्पोर्टस मळेवाड विजेता

*सिद्धेश्वर दाळकर तळवडे उपविजेता

*💫सावंतवाडी दि.२३-:* मळेवाड येथील माऊली कला क्रीडा मंडळाच्यावतीने शनिवारी मळेवाड येथे झालेल्या खुल्या रस्सीखेच स्पर्धेत प्रणाली स्पोर्टस मळेवाड संघ विजेता तर सिद्धेश्वर दाळकर तळवडे संघ उपविजेता ठरला. स्पधेर्चे उदघाटन जेष्ठ नागरीक बाबल नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर बाबल नाईक, गुरुप्रसाद नाईक, रमाकांत नाईक, हेमंत मराठे, नंदू नाईक, सुरेश नाईक, भाऊ आजगावकर, मदन मुरकर, लाडोबा केरकर, जनार्दन नाईक, माऊली कला क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते, स्पर्धक व क्रीडा रसिक उपस्थित होते. भव्य अशी रस्सीखेच स्पर्धा प्रथमच मळेवाड येथे आयोजित करून क्रीडा रसिकांना एक प्रकारे या मंडळाने मेजवानीच दिली होती. ही स्पर्धा सहाशे किलो वजनी गटात खेळविण्यात आली. सर्वच सामने अटीतटीचे झाले. मात्र अंतिम सामन्यासाठी मळेवाड येथील प्रणाली कबड्डी स्पोर्ट व तळवडे येथील सिद्धेश्वर दाळकर या संघांनी बाजी मारली. या दोघात अंतीम सामन्यासाठी लढत झाली. अगदी रोमहर्षक लढत होत असताना क्रीडा रसिक पण या दोघांना प्रोत्साहन देत होते. स्पर्धेत प्रणाली कबड्डी स्पोर्ट मळेवाड प्रथम विजेता संघ ठरला तर सिद्धेश्वर दाळकर उपविजेता संघ ठरला. तसेच बेस्ट फ्रंट मॅन म्हणून अभिषेक तेंडोलकर, बेस्ट लास्ट मॅन म्हणून राजा मालवणकर यांची निवड करण्यात आली. या स्पर्धेसाठी पंच म्हणून किशोर सोन्सुरकर, भाऊ आजगावकर, हेमंत नाईक, भूषण मसुरकर, जयेश परब, मनोहर कावले, हेमंत गावडे, रुपेश मोर्जे, अमोल तांडेल यांनी काम पाहिले. तर सुरेंद्र मेस्त्री, ज्ञानेश्वर मुळीक यांनी समालोचनाचे काम केले. कार्यक्रमाची प्रस्तावना नंदू नाईक यांनी केली. माऊली कला क्रीडा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी स्पर्धेच्या यशस्वीततेसाठी विशेष मेहनत घेतली.

You cannot copy content of this page