Headlines

माहिती सहाय्यक हेमंत चव्हाण यांचा विशेष पुरस्काराने सत्कार

महसूल दिनी जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी केला सन्मान *⚡ओरोस ता.०६-:* शुक्रवारी झालेल्या महसूल दिन कार्यक्रमात जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती सहाय्यक हेमंतकुमार चव्हाण यांचा जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी विशेष पुरस्कार देऊन सन्मान केला. कोरोना काळात जिल्हा प्रशासन व प्रसार माध्यमे यांच्यात समन्वय राखण्यात श्री चव्हाण यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे हा सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील…

Read More

नूतन नगराध्यक्षांच्या आगमनाने शहरात बेकायदा धंदयाना उत

नगराध्यक्ष संजू परब यांच्यावर युवासेना शहरअधिकारी विशाल सावंत यांचा निशाणा *⚡सावंतवाडी ता.०६-:* सावंतवाडीत यापूर्वी गांजाविक्री सारखे प्रकार होत नव्हते मात्र नूतन नगराध्यक्षांच्या आगमनाने आता नाक्या-नाक्यावर टपऱ्या उभ्या होत असून शहरात अनेक बेकायदेशीर धंदे सुरू आहेत त्याला साथ कोणाची आहे हे लवकरच आम्ही जनतेसमोर आणू असे युवा सेना शहर अधिकारी विशाल सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर…

Read More

जिल्ह्यात आज आणखी १४२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह

*💫सिंधुदुर्गनगरी दि.०६-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४५ हजार ५०७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २,हजार २९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १४२ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Read More

एस.एम.हाय.चे कर्मचारी चंद्रकांत तांबे यांचे निधन

*⚡कणकवली दि.०६-:* कणकवली तालुक्यातील नांदगाव बौध्दवाडी तील चंद्रकांत भागोजी तांबे (वय 56 )यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. कणकवली एस् एम् हायस्कूलचे कर्मचारी म्हणून सेवेत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा ,मुलगी, बहिणी असा परिवार आहे. त्यांच्या या निधनाने नांदगाव व एस.एम.हाय.कर्मचाऱ्यामधून हळहळ व्यक्त केले जात आहे.

Read More

बीएसनल नेटवर्कची सुरळीत न केल्यास सिमकार्ड परत करत उपोषण करणार

आचरा गावचे माजी सरपंच चंदन पांगे यांनी दिला इशारा मालवण दि प्रतिनिधी आचरा बीएसनल टॉवर लाईट गेल्यावर बंद होत असल्याने नेटवर्क गायब होत आहे.  पंचक्रोशीतील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येत्या आठ दिवसात बीएसनल टॉवरला बॅकअप बॅटरी बसवून नेटवर्कची सुविधा सुरळीत न केल्यास गावातील बीएसनल सिमकार्ड परत करत उपोषणाला बसण्याचा इशारा आचरा गावचे…

Read More

उपजिल्हा रुग्णालय संदर्भात वारंवार अर्ज करूनही सा.बां.कडून दखल नाही

युवा रक्तदाता संघटना १५ ऑगस्टला अधिकाऱ्यांना घालणार घेराव *⚡सावंतवाडी ता.०६-:* सार्वजनिक बांधकाम विभागाला उपजिल्हा रुग्णालय संदर्भात वारंवार अर्ज करून देखील कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे येत्या १५ ऑगस्टला ध्वजारोहणानंतर संबंधित अधिकाऱ्यांना जागेवरून हलू दिले जाणार नाही. असा इशारा युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून देण्यात आला आहे. यावेळी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात असे म्हटले की, सावंतवाडी उपजिल्हा रूग्णालयातील…

Read More

सोमवारपासून भारमान असलेल्या भागातील तर 15 ऑगस्टपासून नियमित एसटी फेऱ्या सुरु होतील

कणकवली तालुका भाजपा शिष्टमंडळाला विभाग नियंत्रकांचे आश्वासन *⚡कणकवली दि.०६-:* कोकणातील सर्वात मोठा गणेश चतुर्थी सन आहे. त्यावेळी मुंबईहून मोठया प्रमाणात चाकरमानी कोकणात येणार आहेत. त्यामुळे त्यांचीही प्रवासाची सोय होणे आवश्यक आहे. त्यामुळे सध्या बंद असलेली ग्रामिण भागातील एस.टी ची बस सेवा कीमान 50 टक्के क्षमतेने तसेच सोशल डीस्टंसींगचे नियमांचे पालन करून सुरू करणेत यावी अशी…

Read More

कामाच्या तणावातही आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी *⚡सिंधुदुर्गनगरी दि.०६-:* महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कामाचा मोठा तणाव असतो. पण या तणावामध्ये ही आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. विशेषतः मानसिक आरोग्याची काळजी प्रत्येकाने घ्यावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या जुन्या सभागृहात आयोजित महसूल दिनाच्या कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपिठावर अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, सहाय्यक…

Read More

देवबाग किनारी मिळाली मौल्यवान देवामाशाची उलटी

वनविभागाने ११ किलोचा पदार्थ घेतला ताब्यात *⚡मालवण दि.०६-:* पर्यटनदृष्ट्या महत्वपूर्ण मानल्या गेलेल्या देवबाग ख्रिश्चनवाडीच्या समुद्रकिनाऱ्यावर आज सकाळी फ्रान्सिस जॉन फर्नांडिस आणि किस्तु लुद्रीक या मच्छीमारांना मौल्यवान असा ‘अंबरग्रीस’ हा देवमाशाच्या (व्हेल मासा) उलटीसदृश अत्यंत सुवासिक व मौल्यवान पदार्थ सापडला असून सुमारे ११ किलो वजनाची ही उलटी वनविभागाने ताब्यात घेतली आहे पीठासारखा चिकट असलेला हा पदार्थ…

Read More

मायनिंग विरोधात कळणेवासियांच्या आंदोलनात मनसेची सामील होणार

मायनिंगमुळे किती गावकऱ्यांना रोजगार मिळाला याचे उत्तर द्या:परशुराम उपरकर यांचा सवाल *⚡कणकवली दि.०६-:* जिल्हाधिकाऱ्यांनी तूर्तास मायनिंग बंदचा इशारा जरी दिला असला, तरी हे मायनिंग कधीपर्यंत बंद ठेवले जाणार याविषयी शंका आहे. त्यामुळेच मायनिंग पूर्णतः बंद करण्यात यावे या मागणीसाठी कळणेवासियांनी १४ आॕगस्टनंतर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाला मनसेचा पूर्ण पाठिंबा असून मनसे या…

Read More
You cannot copy content of this page