नूतन नगराध्यक्षांच्या आगमनाने शहरात बेकायदा धंदयाना उत

नगराध्यक्ष संजू परब यांच्यावर युवासेना शहरअधिकारी विशाल सावंत यांचा निशाणा

*⚡सावंतवाडी ता.०६-:* सावंतवाडीत यापूर्वी गांजाविक्री सारखे प्रकार होत नव्हते मात्र नूतन नगराध्यक्षांच्या आगमनाने आता नाक्या-नाक्यावर टपऱ्या उभ्या होत असून शहरात अनेक बेकायदेशीर धंदे सुरू आहेत त्याला साथ कोणाची आहे हे लवकरच आम्ही जनतेसमोर आणू असे युवा सेना शहर अधिकारी विशाल सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले असून त्यात म्हटले आहे की गांजा प्रकरणाबाबत नगराध्यक्षांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे याअगोदर आपल्या शहरात असे प्रकार होत नव्हते पण नुतन नगराध्यक्षांच्या आगमनाने शहरात नाक्या नाक्यावर टपऱ्या उभ्या होत आहेत यावर टाळेबंदी आणण्याव्यतिरीक्त आपले नगराध्यक्ष प्रेस घेऊन सभ्यतेचा आव आणत आहेत हे निंदनीय आहे. खरीच नगराध्यक्षांना युवावर्गाची काळजी असेल तर जुगार, मटका आणि अमली पदार्थांविरोधात स्वतः या गोष्टी वर लक्ष घालावे आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे. पोलीसांचा तपास सुरू आहे पण सावंतवाडीतील युवा तरुणाई या गांजा प्रकरणात आहे परंतु यातील *तो* म्होरक्या कोण? याचा शोध घेणे गरजेचे आहे. तसेच सावंतवाडी शहरात अनेक बेकायदेशीर धंदे सुरू आहेत अर्थात त्याला साथ कुणाची हे लवकरच आम्ही जनतेसमोर आणू असे युवा सेना शहर अधिकारी श्री विशाल सावंत यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले

You cannot copy content of this page