माहिती सहाय्यक हेमंत चव्हाण यांचा विशेष पुरस्काराने सत्कार

महसूल दिनी जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी केला सन्मान

*⚡ओरोस ता.०६-:* शुक्रवारी झालेल्या महसूल दिन कार्यक्रमात जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती सहाय्यक हेमंतकुमार चव्हाण यांचा जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी विशेष पुरस्कार देऊन सन्मान केला. कोरोना काळात जिल्हा प्रशासन व प्रसार माध्यमे यांच्यात समन्वय राखण्यात श्री चव्हाण यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे हा सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजनाच्या जुन्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात महसूल प्रशासनात गेल्या आर्थिक वर्षात सर्वोत्तम काम करणाऱ्या उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, नायब तहसीलदार यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी व्यासपिठावर अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, सहाय्यक जिल्हाधिकारी संजिता महोपात्रा, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, सामान्य प्रशासनच्या उपजिल्हाधिकारी रोहिणी रजपूत, रोहयोचे उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकर आदी उपस्थित होते. जिल्हा माहिती कार्यालयाचे माहिती सहाय्यक हेमंतकुमार चव्हाण यांनी मार्च २०२० पासून कोरोना कालावधीत कोरोना संबंधी जिल्हा प्रशासनाची भूमिका, निर्णय, कोरोना स्थिती याबाबत नियमित माहिती जिल्ह्यातील माध्यमांपर्यंत पोहोचविण्याची महत्वाची भूमिका बजावली आहे. बाहेर फिरणे धोक्याचे असतानाच्या काळात सुद्धा त्यांनी ही माहिती पुरविण्यात खंड पडू दिलेला नाही. त्यामुळे त्यांचा जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी विशेष सत्कार केल्याने माध्यम क्षेत्रात सुद्धा समाधान व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page