Headlines

कोंडुरे तिठा येथील खड्डा देतोय अपघातास आमंत्रण…

खड्ड्याकडे दुर्लक्ष होत असल्याने तो अधिकच रुंदावतोय.. ⚡सावंतवाडी ता.१८-: तालुक्यातील कोंडुरे तिठा येथील रस्त्याच्या मधोमध असलेला खड्डा सध्या अपघातास कारणीभूत ठरत असून,याबाबत स्थानिकांनी संबंधित अधिकाऱ्यांना ही बाब निदर्शनास आणून सुद्धा अजून पर्यंत हा धोकादायक खड्डा बुजविला नसल्याने तो अधिकच रुंदावत असून खोल पर्यंत पडला आहे.कोंडुरे तिठा येथे रस्त्याच्या मधोमधच असलेल्या या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी…

Read Full News

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली प्राणी जन्म नियंत्रण केंद्राला भेट…

⚡सिंधुदुर्गनगरी,ता.१८-: जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यांनी कणकवली येथील ABC (Animal Birth Control) केंद्राला सोमवार (दि १६ मार्च) रोजी भेट देऊन केंद्राच्या कामकाजाची सविस्तर पाहणी केली. या भेटीदरम्यान केंद्रातील विविध नोंदी, स्वच्छता व्यवस्था, कुत्र्यांच्या देखभालीची सुविधा तसेच शस्त्रक्रिया प्रक्रियेबाबत माहिती घेण्यात आली. पाहणीदरम्यान काही बाबींमध्ये त्रुटी आढळून आल्याने संबंधित यंत्रणेला कामकाज अधिक शिस्तबद्ध व नियमांनुसार करावे…

Read Full News

आईच्या निधनानंतरही सईचा धाडसी निर्णय; दहावीचा शेवटचा पेपर दिला…

⚡कणकवली ता.१७-: शिवडाव माध्यमिक विद्यालय, शिवडाव येथील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कुमारी सई संतोष सावंत हिने अत्यंत दुर्दैवी प्रसंगातही धैर्य दाखवत परीक्षेला हजेरी लावली. सई ही शिवडाव ओटोसवाडी येथील रहिवासी आहे. ती येथील शिवडाव माध्यमिक विद्यालय शिवडाव येथे शिक्षण घेत आहे. आज तिच्या दहावीच्या परीक्षेचा शेवटचा पेपर असताना, काल उशिरा रात्री तिची आई कै. सौ. साक्षी…

Read Full News

शहरातील भुयारी गटार योजनचा एस्टिमेट तयार, लवकरच प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री यांच्याकडे निधीसाठी मागणी करणार…

अनिल निरवडेकर:तर राजवाड्यासमोर लवकरच खाऊ गल्ली सुरू होणार.. ⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडी शहरातील भुयारी गटार योजना पूर्णत्वास नेण्यासाठी कोल्हापूर येथील तज्ञांकडून अंदाजपत्रक (एस्टिमेट) तयार करून घेण्यात आले असून, लवकरच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण व पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली जाणार असल्याची माहिती प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी दिली. जनतेला दिलेली गॅरंटी पूर्ण…

Read Full News

वेंगुर्ला नं. ४ प्राथमिकशाळेच्या प्रशस्त हॉलसाठीनगरसेविका आकांक्षा परब यांच्यामार्फत पाच सिलिंग फॅन…

⚡वेंगुर्ला ता.१८-: पूर्ण प्राथमिक शाळा वेंगुर्ला क्रमांक ४ येथे शनिवार दिनांक १४ मार्च रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांच्या ईशस्तवन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या शिक्षिका सानिका कदम यांनी केले. त्यांनी महिला दिनाचे महत्त्व, तसेच शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध…

Read Full News

वेंगुर्ला येथे आज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या ३३७ व्या बलिदान दिनानिमित्त मुकपदयात्रा…

⚡वेंगुर्ला ता.१८-: धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी देव-देश-धर्मासाठी संपुर्ण महीनाभर सूर्याच्या प्रकाशालाही लाजवेल असे तेजस्वी दिव्य बलिदान दिले. त्या संपूर्ण बलिदानाच्या महिन्यात अखंड हिंदू समाजाकडून कौटुंबिक व सामाजिक पातळीवर *धर्मवीर बलिदान मास * पाळत आचरणातून आदरांजली वाहिली जाते व शेवटी बलिदान दिनाच्या दिवशी श्री संभाजी महाराज यांच्या वढु बुद्रुक तुळापूर येथील समाधी येथून धर्मवीर ज्वाला…

Read Full News

तळवणे शाळेची मनस्वी कवडे गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात तृतीय…

⚡सावंतवाडी ता.१८-: जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळवणे नंबर १ ची विद्यार्थिनी कु.मनस्वी शिवाजी कवडे ,गुरुकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर आयोजित गुरुकुल प्रज्ञाशोध ( जी.टी.एस) परीक्षेत ह्या विद्यार्थिनीला राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.मनस्वी ही इयत्ता पहिली मध्ये शिक्षण घेत असून तिला या परीक्षेत एकूण १०० गुणांपैकी ९६ गुण मिळाले आहेत.तिच्या या यशाचे सर्व…

Read Full News

ओरोस येथे आज धर्मवीर संभाजी महाराज बलिदान स्मरण अभिवादन कार्यक्रम…

⚡ओरोस ता १८-:धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी प्राणार्पण करणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी बुधवार दिनांक 18 मार्च रोजी सायंकाळी ६.३० ते ८.०० या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, ओरोस फाटा येथे विशेष स्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल हिंदू समाज यांच्या वतीने करण्यात आले…

Read Full News

देवलीत महिला दिनानिमित्त वेशभूषा व नृत्य स्पर्धा उत्साहात संपन्न…

⚡मालवण ता.१७-:ग्रामपंचायत देवली आणि देवलीला ग्रामसंघ, वरची देवली यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त “रोजच्या रूटीन लाइफमधून बाहेर पडून साजरा करूया एक उनाड दिवस ‘ती’चा!” या संकल्पनेतून विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धाना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वरची देवली मधला वाडा येथील प्रिया नरेश चव्हाण यांच्या निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख…

Read Full News

ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे पंचक्रोशी यांचा जीवनगौरव पुरस्कार२०२६ प्रकाश किरात पेडणेकर यांना जाहीर…

⚡मालवण ता.१७-:ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे (फेस्कॉन संलग्न) यांचा जीवनगौरव पुरस्कार २०२६ ज्ञानदीप विद्यामंदिर वांयंगणी या प्रशालेचे माजी मुख्याध्यापक आणि ज्ञानदीप वाचनालय वांयंगणीचे अध्यक्ष प्रकाश किरात पेडणेकर (मु.पो. वांयंगणी, तालुका -मालवण ) यांना जाहीर झाला असून त्याचे वितरण मंगळवार दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी ऐश्वर्य रिसाॅर्ट पिरावाडी आचरे या ठिकाणी संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी यांच्या…

Read Full News

You cannot copy content of this page