केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे काही क्षणात सावंतवाडीत होणार आगमन…
*⚡सावंतवाडी ता.२८-:* सावंतवाडी नगरपालिकेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे काही क्षणातच आगमन होणार असून, त्यांच्या स्वागतासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली आहे.
*⚡सावंतवाडी ता.२८-:* सावंतवाडी नगरपालिकेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे काही क्षणातच आगमन होणार असून, त्यांच्या स्वागतासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली आहे.
कणकवलीतील ३० वर्षीय युवक जखमी *⚡सावंतवाडी ता.२८-:* कोलगाव येथे ट्रक आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकीत कणकवली येथील 30 वर्षीय युवक जख्मी झाला आहे. यावेळी कोलगाव येथील रहिवाशी दिनेश गावडे हे सावंतवाडीच्या दिशेने येत असताना त्यांना सबंधित युवक रस्त्यावर जख्मी अवस्थेत पडलेला दिसून आला. यावेळी त्यांनी त्या युवकाला तातडीने आपल्या गाडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले…
केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे व भाजपा प्रदेश सरचिटणीस रविंद्र चव्हाण यांची उपस्थिती *⚡कणकवली ता.२८-:* सिंधुदुर्ग भाजपा कार्यकर्ता मेळावा शुक्रवार २९ ऑक्टोबर, २०२१ रोजी दुपारी २.३० वाजता महालक्ष्मी हॉल, गुलमोहर हॉटेल, कुडाळ येथे संपन्न होत आहे. या बैठकीला भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे आणि भाजपा प्रदेश सरचिटणीस आम.रविंद्र चव्हाण , प्रदेश चिटणीस प्रमोद जठार,…
*⚡सिंधुदुर्गनगरी दि.२८-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ५१ हजार १९३ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३२६रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १८ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली
माजी आमदार प्रमोद जठार यांची ग्वाही वैभववाडी प्रतिनिधी सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्यातील विकासाची प्रलंबित कामे व रखडलेले प्रकल्प केंद्रीय उद्योगमंत्री नारायणराव राणे यांच्या माध्यमातून मार्गी लावण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी कटिबद्ध आहोत. दहा वर्षाचे अथक प्रयत्न व पाठपुराव्यानंतर कोकिसरे रेल्वे फाटक भुयारी मार्गाच्या कामाला सुरुवात होत आहे. भुयारी मार्गाचे काम हे स्थानिक जमीन मालकांना विश्वासात घेऊन होणार आहे. जमीन…
वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी भाजपा किसान मोर्चा मंडळ अध्यक्षपदी महेश संसारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते श्री.संसारे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. कुडाळ येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये नुतन तालुकाध्यक्ष यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, भाजपा जिल्हा संघटक प्रभाकर सावंत, किसान मोर्चा संयोजक प्रसंन्ना देसाई,…
दत्तात्रय भडकवाड *⚡सिंधुदुर्गनगरी ता.२८-:* यावर्षी दि. 2 ते 6 नोव्हेंबर 2021 दरम्यान दिपावली उत्सव साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी उत्सव साजरा करताना आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी केले आहे. दिवाळीच्या अनुषंगाने गृह विभागाने मार्गदर्शक सूचना…
*⚡मालवण ता.२८-:* भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या मालवण तालुकाध्यक्ष पदी महेश सारंग यांची निवड करण्यात आली आहे. किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष उमेश सावंत यांनी ही निवड जाहीर केली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याहस्ते महेश सारंग यांना कुडाळ येथील बैठकीत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. संध्या तेरसे, सरचिटणीस प्रभाकर सावंत, किसान…
*⚡मालवण ता.२८-:* न्यू गणेश नगर कोळंब भटवाडी येथे शासकीय योजनेअंतर्गत नळपाणी कनेक्शन तसेच सौर पथदिप बसविण्यात याव्यात, अशा मागणीचे निवेदन कोळंब ग्रामस्थांनी कोळंब ग्रापंचायतीला दिले आहे. न्यू गणेश नगर कोळंब भटवाडी वसाहतीमधील ग्रामस्थ कायम रहिवासी असून या वसाहतीमध्ये ३० ते ४० कुटुंबे वास्त्यव्यास आहेत. गेली अनेक वर्षे या ठिकाणी पिण्ट पाण्याचा प्रश्न, सौर पथदिप या…
*⚡मालवण ता.२८-:* मालवण तालुक्यातील ओझर तिठा ते कोळंबकर बंगला रस्त्याची दुरुस्ती न केल्यास रास्तारोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कोळंब भटवाडी येथील ग्रामस्थांनी कोळंब ग्रामपंचायतीला निवेदनाद्वारे दिला आहे. ओझर तिठा ते कोळंबकर बंगला रस्त्यापर्यंत रस्त्यावर खड्डे पडून संपूर्ण रस्ता खड्डेमय बनला झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात व अन्य हंगामात देखील या रस्त्यावरून प्रवास करणे जोखमीचे झाले…