कणकवलीतील ३० वर्षीय युवक जखमी
*⚡सावंतवाडी ता.२८-:* कोलगाव येथे ट्रक आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकीत कणकवली येथील 30 वर्षीय युवक जख्मी झाला आहे. यावेळी कोलगाव येथील रहिवाशी दिनेश गावडे हे सावंतवाडीच्या दिशेने येत असताना त्यांना सबंधित युवक रस्त्यावर जख्मी अवस्थेत पडलेला दिसून आला. यावेळी त्यांनी त्या युवकाला तातडीने आपल्या गाडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.