सावंतवाडीत ‘घे भरारी’ फाउंडेशनचा महिला दिनानिमित्त दशावतार नाट्यप्रयोगला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

सावंतवाडी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ‘घे भरारी’ फाउंडेशन सावंतवाडी यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान येथे केले होते. यात फाउंडेशनच्या महिलांनी सादर केलेला दशावतार नाटकाचा दणदणीत प्रयोग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. स्थानिक महिलांनी साकारलेल्या भुमिकांंना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली.

नृत्य, गायन, लकी ड्रॉ, स्पॉट प्राईज आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन महिला दिनाचे औचित्य साधून करण्यात आले होते. यात घे भरारी फाउंडेशनच्या महिलांनी साकारलेला दशावतारी नाट्यप्रयोग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. दणदणीत नाट्यप्रयोगान रसिक श्रोत्यांची मन महिलांनी जिंकली. या दशावतार नाट्यप्रयोगात महागणपती – मेघा भोगटे, रिद्धी- वैष्णवी बांदेकर, सिद्धी- वंदना मडगांवकर, ताम्रासूर -रेखा कुमठेकर, नारद – समीक्षा मडगांवकर, क्रृत्या – अरूणा नाईक, बलराम – सलोनी वंजारी, कृष्ण – सुस्मिता नाईक, सत्यभामा – मोहिनी मडगांवकर, रूक्मिणी – वैभवी घाटगे, वैजयंती – स्वप्नाली कारेकर यांनी नाट्यतील पात्रे साकारली. तर संगीतसाथ हार्मोनियम- वैभव पाटकर, मृदूंगमणी- निलेश मांजरेकर, ताल रक्षक- समीर मांजरेकर यांनी केली. घे भरारी फाऊंडेशन च्या सदस्यांनी सादर केलेले गौरव शिर्के लिखित व दिग्दर्शित ‘कृष्णभोजन’ दशावतार नाटक महापुरुष दशावतार नाट्य मंडळाच्या सहकार्याने सादर केल. महिलांचा या दणदणीत सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन साहस प्रतिष्ठान संचलित दिव्यांग विकास केंद्रातील चिमुकल्या मुलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी पोलीस अधिकारी ज्योती दूधवडकर, सावंतवाडीच्या नवनिर्वाचित नगरसेविका तथा उद्यान सभापती मोहिनी मडगावकर, नगरसेविका सुकन्या टोपले, नगरसेविका दीपाली भालेकर, दुलारी रांगणेकर, सुनीता पेडणेकर, नीलम नाईक, संजना परब, उपसंपादक मंगल नाईक-जोशी, यांचा शाल, श्रीफळ , गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उद्योजक महेश. कुमठेकर यांच्या मिळत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रुपच्या मुलांनी व घे भरारी फाऊंडेशनच्या सदस्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. झटपट प्रश्नांना महिलांनीही उत्तम दाद देऊन बक्षिसे पटकावली. फाऊंडेशनच्या कार्याध्यक्ष मेघना राऊळ यांनी कार्यक्रमाचे निवेदन केल.

You cannot copy content of this page