डॉ. संदीप सावंत:२४ मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे विशेष मेगा स्पेशालिस्ट कॅम्प..
⚡वेंगुर्ला ता.१०-: सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या संकल्पनेतून जिल्हा शल्यचिकित्सक सिंधुदुर्ग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग आणि जिल्हा आरोग्य अधिकारी सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामीण भागातील रुग्णांना तज्ञ डॉक्टरांच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी २४ मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे विशेष मेगा स्पेशालिस्ट कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. यापूर्वी योग्य प्रकारे तपासणी होऊन त्या त्या स्पेशालिटी चे रुग्ण संदर्भित करता यावे यासाठी सोमवार दि. १६ मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथे विशेष स्क्रिनिंग कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हृदयरोग, ग्रंथिरोग, स्त्रीरोग, कर्करोग, पोटाचे विकार, अस्थिरोग, मूत्ररोग या रोगांसाठी स्क्रिनिंग करून सदरील रुग्णांना २४ मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे आयोजित विशेष मेगा स्पेशालिस्ट कॅम्प साठी संदर्भित करण्यात येणार आहे. तरी या स्क्रिनिंग कॅम्प करिता वेंगुर्ला तालुक्यातील कार्यक्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व शहरी भागातील वरील प्रमाणे रुग्णांना दिनांक १६ मार्च रोजी उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला येथे संदर्भित करण्यात यावे, असे आवाहन वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत यांनी केले आहे.
