केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे व भाजपा प्रदेश सरचिटणीस रविंद्र चव्हाण यांची उपस्थिती
*⚡कणकवली ता.२८-:* सिंधुदुर्ग भाजपा कार्यकर्ता मेळावा शुक्रवार २९ ऑक्टोबर, २०२१ रोजी दुपारी २.३० वाजता महालक्ष्मी हॉल, गुलमोहर हॉटेल, कुडाळ येथे संपन्न होत आहे. या बैठकीला भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे आणि भाजपा प्रदेश सरचिटणीस आम.रविंद्र चव्हाण , प्रदेश चिटणीस प्रमोद जठार, निलेश राणे, आमदार नितेश राणे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल काळसेकर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग संघटन मंत्री शैलेंद्र दळवी प्रदेश कार्यकारिणी सदस्य अजित गोगटे ,दत्ता सामंत हे मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याला सर्व जिल्हा पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य,सर्व मोर्चा/आघाडी जिल्हा तसेच मंडल अध्यक्ष,जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष,विषय समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सभापती, पं स.सदस्य नगराध्यक्ष,नगरसेवक, भाजपा लोकप्रतिनिधी तसेच प्रमुख पदाधिकारी अपेक्षित आहेत. तरी सर्व अपेक्षित पदाधिकारी, सदस्य, लोकप्रतिनिधी यांनी वेळेत मेळाव्याच्या स्थळी उपस्थित रहावे,असे आवाहन भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले आहे.