संजना परब यांचा वटसावित्री महिला मंडळाच्यावतीने सन्मान…

⚡सावंतवाडी ता.१०-: खासकीलवाडा येथील वटसावित्री महिला मंडळाच्यावतीने महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या संजना परब यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

संजना परब या नेहमीच सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर राहून खासकीलवाडा परिसरातील विविध कार्यक्रमांना मोलाचे योगदान देत असतात. त्यांच्या या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत महिला मंडळाच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल कौतुकाची भावना व्यक्त केली.

You cannot copy content of this page