ओझर कातवड रस्त्याची दुरूस्ती न केल्यास रास्तारोको आंदोलन

*⚡मालवण ता.२८-:* मालवण तालुक्यातील ओझर तिठा ते कोळंबकर बंगला रस्त्याची दुरुस्ती न केल्यास रास्तारोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कोळंब भटवाडी येथील ग्रामस्थांनी कोळंब ग्रामपंचायतीला निवेदनाद्वारे दिला आहे. ओझर तिठा ते कोळंबकर बंगला रस्त्यापर्यंत रस्त्यावर खड्डे पडून संपूर्ण रस्ता खड्डेमय बनला झाला आहे. त्यामुळे पावसाळ्यात व अन्य हंगामात देखील या रस्त्यावरून प्रवास करणे जोखमीचे झाले आहे. जिल्हा परिषद विभागाने कातवड प्राथमिक शाळा ते त्यापुढील रस्त्याची दुरुस्ती केली मात्र कोळंबकर बंगला ते ओझर तिठा या रस्त्याची दुरुस्ती जाणीवपूर्वक रोखली गेली. गेली अनेक वर्षे या रस्त्याचे डांबरीकरण झाले नसल्याने याचा त्रास देखील ग्रामस्थांना होत आहे. केवळ मतदानाएवढीच ग्रामस्थांची दखल घेणाऱ्या कोळंब ग्रामपंचायतीने देखील या • रस्त्याच्या दुरुस्तीविषयी कोणताही पाठपुरावा केलेला नाही. तरी रस्त्याच्या दुरुस्तीविषयी कोणतेही दखल न घेतल्यास भर रस्त्यावर रास्तारोको किंवा त्याही पेक्षा आंदोलन करण्यात येईल, असे ग्रामस्थानी ग्रामपंचायतीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

You cannot copy content of this page