*⚡मालवण ता.२८-:* न्यू गणेश नगर कोळंब भटवाडी येथे शासकीय योजनेअंतर्गत नळपाणी कनेक्शन तसेच सौर पथदिप बसविण्यात याव्यात, अशा मागणीचे निवेदन कोळंब ग्रामस्थांनी कोळंब ग्रापंचायतीला दिले आहे. न्यू गणेश नगर कोळंब भटवाडी वसाहतीमधील ग्रामस्थ कायम रहिवासी असून या वसाहतीमध्ये ३० ते ४० कुटुंबे वास्त्यव्यास आहेत. गेली अनेक वर्षे या ठिकाणी पिण्ट पाण्याचा प्रश्न, सौर पथदिप या प्रश्नांना तोंड लागत आहे. याबाबत कोळंब ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी करून देखील ग्रामस्थांच्या समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे. तरी या समस्या दूर होण्यासाठी ग्रामपंचायतीने तात्काळ लक्ष द्यावे, असे ग्रामस्थानी निवेदनात म्हटले आहे.
कोळंब भटवाडी येथे नळपाणी कनेक्शन, सौर पथदिप बसविण्याची मागणी
