वैभववाडी भाजपा किसान मोर्चा मंडळ अध्यक्षपदी महेश संसारे

वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी भाजपा किसान मोर्चा मंडळ अध्यक्षपदी महेश संसारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते श्री.संसारे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. कुडाळ येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये नुतन तालुकाध्यक्ष यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश सावंत, भाजपा जिल्हा संघटक प्रभाकर सावंत, किसान मोर्चा संयोजक प्रसंन्ना देसाई, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, चिटणीस बंड्या सावंत, ज्येष्ठ नेते विलास हडकर, बाळा सावंत, ज्ञानेश्वर केळजी, अशोक शिरवडकर आदी उपस्थित होते. महेश संसार यांची जिल्ह्यात प्रगतशील शेतकरी अशी ओळख आहे. मांगवली येथे सुवर्ण सिंधू गीर गो शाळा व पंचगव्य चिकित्सा केंद्र यांच्या माध्यमातून ते काम करत आहेत. गायीच्या शेनापासून गणेश मुर्त्या व गोमय पणत्या बनविण्याचा उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबविला आहे. प्रवण फार्मर प्रोड्यूसर कंपनी वैभववाडीचे महेश संसारे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. तालुका खरेदी विक्री संघाचे ते विद्यमान चेअरमन आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा देशी गोपालक उत्पादक संघाचे ते अध्यक्ष आहेत. कोकण विद्या प्रसारक मुंबई मंडळाचे श्री महेश संसारे उपाध्यक्ष आहेत. वैश्य समाज वैभववाडीचे उपाध्यक्ष आहेत. माजी सरपंच म्हणून त्यांनी यशस्वी काम केले होते. तंटामुक्ती अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य म्हणून ते सध्या कार्यरत आहेत. किसान मोर्चा तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे आहे.

You cannot copy content of this page