Headlines

अभिजित महाले यांना पीएचडी

वेंगुर्ला ता.१९-:* वेंगुर्ला येथील रहिवासी व बांदा-पानवळ येथील गोगटे वाळके महाविद्यालयाचे अकौंटन्सी विषयाचे वरिष्ठ प्राध्यापक अभिजीत महाले यांना अलिकडेच मुंबई विद्यापीठाची पीएचडी ही संशोधनपर पदवी घोषित करण्यात आली. त्यांनी ‘इको टुरीझम इंडस्ट्री ः अॅन इंजिन फॉर इकॉनॉमिक ग्रोथ ऑफ सिंधुदुर्ग‘ यावर संशोधन करून विद्यापीठाला प्रबंध सादर केला होता. संशोधन प्रबंधाचे परिक्षण धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठ…

Read More

राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा प्रभावीपणे पुढे केल्यामुळे इतर पक्षांच्या पोटात पोटशूळ उठले

मनसे सरचिटणीस माजी आम.परशुराम उपरकर यांची टीका कणकवली ता.१९-:* सत्ताधारी शिवसेना पक्ष आता हिंदुत्ववाद सोडून सेक्युलर झाला आहे. बाळासाहेबांच्या जुन्या भाषणांचे व्हिडिओ पाहिले तर त्यातून प्रखर हिंदुत्वाचे दर्शन घडते.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाडवा मेळावा आणि ठाण्यातील मेळाव्यामुळे सत्ताधारी राजकीय पक्ष घाबरले आहेत. त्यामुळे विविध आरोप होत आहेत. मात्र मराठी माणूस आणि हिंदुत्वासासाठी मनसेची स्थापना…

Read More

नागवे सरपंचांसह शिवसैनिकांचा भाजपा प्रवेश

आम.नितेश राणेंचा नागवेत शिवसेनेला धक्का कणकवली  ता.१९-:* कणकवली तालुक्यातील कणकवली शहरानजीकच्या नागवे गावचे सरपंच नारायण आर्डेकर यांच्यासह प्रमुख शिवसैनिकांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपाचे कमळ हाती घेतले. खुद्द सरपंच नारायण आर्डेकर हे भाजपात दाखल झाल्यामुळे आ. नितेश राणे यांनी नागवे गावात सेनेला मोठा धक्का दिल्याचे दिसून येत आहे. सरपंच नारायण आर्डेकर यांच्यासह शिवसैनिक अमेय…

Read More

साहित्य प्रेरणा कट्ट्याची १८ व्या सभेचे २३ मार्चला आयोजन …

सावंतवाडी ता 19:    आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याची अठरावी सभा शनिवार २३ मार्चला सायंकाळी पाच वाजता आजगाव वाचनालयात आयोजित करण्यात आली आहे ऑक्टोबर २०१८ पासून कार्यरत असलेल्या हा साहित्य कट्टा कोरोना काळानंतर पुन्हा सुरू होत आहे .    जागतिक पुस्तक दिना निमित्त आयोजित केलेल्या या सभेत ‘आवडीचे पुस्तक व पुस्तकांची आवड ‘ याविषयावर चर्चा होणार…

Read More

मळगाव ब्राम्हणआळी येथील हनुमान मंदीरात हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा…

सावंतवाडी ता.१९-:* श्री हनुमान कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ मळगांव पिंपळवाडी ब्राम्हणआळी येथील हनुमान मंदिरमध्ये हनुमान जयंती सोहळा मोठ्या उत्साहात व धार्मिक व सांस्कृतिक वातावरणात संपन्न झाला यावेळी रात्री नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा महान पौराणिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. हनुमान जयंती सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या नाट्य प्रयोगावेळी आग्रा येथील एकलव्य स्पोर्टर्स स्टेडियमवर संपन्न झालेल्या…

Read More

कुणकेरी जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध अभिनव उपक्रमानी साजरी…

सावंतवाडी ता.१९-: भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 131 वा जयंती उत्सव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुणकेरी नंबर 1 मध्ये वेगवेगळे अभिनव संकल्पनेतून साजरा करण्यात आला. गौतम बुद्ध संतश्रेष्ठ तुकाराम महाराज राजमाता जिजाऊ, संत कबीर, ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजर्षिशाहू महाराज शाहू पिता महात्मा गांधी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू बाबासाहेबांचे पिताजी रामजी सुभेदार…

Read More

ढगाळ वातावरणामुळे आंबा-काजू आदींचे प्रचंड नुकसान

विकास संस्थांच्या निवडणुकीत राजकारण तापले;एसटी संपामुळे बाजारपेठांमध्ये मंदी *⚡कणकवली ता.१९-:* फळांचा राजा हापूस आंबा हा सद्या आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोकणात अधुनमधून पाऊस पडत आहे. सोसाट्याच्या वारा वाहत असतो. त्यातच ढगाळ वातावरणामुळे उष्णता वाढली आहे. त्याच्या एकत्रित परिणामामुळे अपरिपक्व हापूस आंब्यासह काढणीला आलेले आंबेही जमिनदोस्त झाले आहे. झाडांवर शिल्लक असलेल्या आंब्यांवर पाऊसाचे…

Read More

आठ दिवसांत “त्या” रस्त्यावर कार्पेट चे काम सुरू करा; अन्यथा बांधकाम कार्यालयाला ठोकणार टाळे…

मनसे उपतालुकाध्यक्षांचा इशारा;पिंगुळी वडगणेश ते माणकादेवी रस्त्याची दुर्दशा कुडाळ ता.१९-:* पिंगळी वडगणेश ते माणकादेवी रस्त्याची दुर्दशा झाली असून, याबाबत वारंवार लक्ष वेधून देखील उद्याप या रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या रस्त्याचे बीबीएम होऊन बरेच दिवस उलटूनही अजूनही या रस्त्यावर कार्पेट करण्यात आले नाही. येत्या आठ दिवसात या रस्त्यावर…

Read More

मळगांव येथील “एक गाव एक संघ” क्रिकेट स्पर्धेत होडावडेचा “नो चान्स” संघ विजेता

तर मळगांव संघ उपविजेता सावंतवाडी ता.१९-:* मळगांव चॅम्पियन्स ट्रॉफी 2022 या भव्य अशा “एक गाव एक संघ” ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेत होडावडेचा “नो चान्स” संघ प्रथम विजेता तर “संपूर्ण मळगांव इलेव्हन” संघ उपविजेता ठरला. या विजेत्या संघांसहित उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक व मालिकावीर यांना रोख पारितोषिक व ट्राॅफी तसेच दोन्ही संघांना रोख पारितोषिक…

Read More

चोरट्यांचा धुडगूस सुरू; वैभववाडी पाठोपाठ कणकवली तालुक्यात तळेरेत दुकाने फोडली

लागोपाठच्या दुकानफोडयांनी पोलिसांसमोर तपासाचे आव्हान कणकवली ता.१८-:* चोरट्यानी पुन्हा एकदा सिंधुदुर्गात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे.वैभववाडी तालुक्यात रविवारी चोरट्यांनी धुडगूस घातल्यानंतर महामार्गावरील तळेरे बाजारपेठेतील तब्बल 12 हून अधिक दुकाने सोमवारी पहाटे।चोरट्यांनी फोडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात एका दुकानदाराची तब्बल 4 लाखाहून अधिक कॅश चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सोमवारी पहाटे…

Read More
You cannot copy content of this page