आठ दिवसांत “त्या” रस्त्यावर कार्पेट चे काम सुरू करा; अन्यथा बांधकाम कार्यालयाला ठोकणार टाळे…

मनसे उपतालुकाध्यक्षांचा इशारा;पिंगुळी वडगणेश ते माणकादेवी रस्त्याची दुर्दशा

कुडाळ ता.१९-:* पिंगळी वडगणेश ते माणकादेवी रस्त्याची दुर्दशा झाली असून, याबाबत वारंवार लक्ष वेधून देखील उद्याप या रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. या रस्त्याचे बीबीएम होऊन बरेच दिवस उलटूनही अजूनही या रस्त्यावर कार्पेट करण्यात आले नाही. येत्या आठ दिवसात या रस्त्यावर कार्पेटचे काम सुरू न केल्यास सार्वजनिक बांधकामच्या कुडाळ कार्यालयाला टाळे ठोकणार असा इशारा मनसेचे तालुका उपाध्यक्ष दीपक गावडे यांनी दिला आहे.

You cannot copy content of this page