Headlines

साटेली-तर्फ सातार्डा येथील अंगणवाड्यांना कुकर भेट…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा मोर्चा सिंधुदुर्ग व कोकण सम्राट ग्रुपचा सामाजिक उपक्रम..

⚡सावंतवाडी ता.२५-: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप युवा मोर्चा सिंधुदुर्ग तसेच कोकण सम्राट ग्रुपचे संजय नाईक यांच्या माध्यमातून साटेली-तर्फ सातार्डा गावातील दोन्ही अंगणवाड्यांना कुकर भेट स्वरूपात प्रदान करण्यात आले.

या उपक्रमामुळे अंगणवाडीतील लहान मुलांच्या पोषण आहाराच्या तयारीसाठी आवश्यक साहित्य उपलब्ध होण्यास मदत होणार असून, अंगणवाडी सेविकांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी तसेच पालकांनी कौतुक केले.
यावेळी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अंगणवाडी सेविका तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, त्याचाच एक भाग म्हणून हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

You cannot copy content of this page