साहित्य प्रेरणा कट्ट्याची १८ व्या सभेचे २३ मार्चला आयोजन …

सावंतवाडी ता 19:    आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याची अठरावी सभा शनिवार २३ मार्चला सायंकाळी पाच वाजता आजगाव वाचनालयात आयोजित करण्यात आली आहे ऑक्टोबर २०१८ पासून कार्यरत असलेल्या हा साहित्य कट्टा कोरोना काळानंतर पुन्हा सुरू होत आहे .

   जागतिक पुस्तक दिना निमित्त आयोजित केलेल्या या सभेत ‘आवडीचे पुस्तक व पुस्तकांची आवड ‘ याविषयावर चर्चा होणार आहे यात मुख्यत्वे डाॅ. सुधाकर ठाकूर, डाॅ. मधुकर घारपुरे व विनय सौदागर आपले विचार मांडणार आहेत या सभेस सर्व साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन कट्ट्याचे संघटक विनय सौदागर यांनी केले आहे

You cannot copy content of this page