सावंतवाडी ता.१९-:* श्री हनुमान कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ मळगांव पिंपळवाडी ब्राम्हणआळी येथील हनुमान मंदिरमध्ये हनुमान जयंती सोहळा मोठ्या उत्साहात व धार्मिक व सांस्कृतिक वातावरणात संपन्न झाला यावेळी रात्री नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा महान पौराणिक नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.
हनुमान जयंती सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित केलेल्या नाट्य प्रयोगावेळी आग्रा येथील एकलव्य स्पोर्टर्स स्टेडियमवर संपन्न झालेल्या ज्यूनिअर मास्टर इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलेल्या मळगांव रस्तावाडी चा सुपुत्र प्रथमेश कातळकर व पाचव्या क्रमांकावर निवड झालेल्या मळगांव ब्राह्मणआळी चा सुपुत्र रामदास राऊळ व प्रख्यात रंगभूषाकार संजय जोशी यांचा विशेष सत्कार श्री हनुमान कला क्रीडा क्रीडा व सांस्कृतिक मंडळ मळगांव पिंपळवाडी ब्राम्हणआळी यांच्या वतीने करण्यात आला यावेळी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते महादेव राऊळ,देवानंद राऊळ,सुरज राऊळ,निलेश ठाकुर,अजित सातार्डेकर,अजित नाईक,राजन राऊळ, शंकर केरकर ,सुभाष राऊळ,बुधाजी नाईक,सखाराम राऊळ,बापु राऊळ,देवदास नाईक,सागर केरकर,वासुदेव केरकर,अरविंद केरकर,झिलु राऊळ,वसंत राऊळ शामसुंदर राऊळ,हनुमंत केरकर,महादेव केरकर,गोपी राऊळ,प्रमोद राऊळ,किरण राऊळ,नित्यानंद राऊळ,सतिश राऊळ,मनोज राऊळ व अपाजी राऊळ आदी उपस्थित होते
