सावंतवाडी ता.१९-: भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा 131 वा जयंती उत्सव जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुणकेरी नंबर 1 मध्ये वेगवेगळे अभिनव संकल्पनेतून साजरा करण्यात आला.
गौतम बुद्ध संतश्रेष्ठ तुकाराम महाराज राजमाता जिजाऊ, संत कबीर, ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राजर्षिशाहू महाराज शाहू पिता महात्मा गांधी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू बाबासाहेबांचे पिताजी रामजी सुभेदार पत्नी माता रमाई या व्यक्तिरेखा मुलांनी अप्रतिम दृश्य साकारल्या होत्या यावेळी प्रत्येक युगनायकाने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन व सामाजिक कार्यावर आपले मत प्रकट केले
यावेळी कोलगाव केंद्राचे केंद्रप्रमुख म ल देसाई देवरुख आर्ट कॉलेजचे प्राचार्य रणजीत देसाई शाळा व्यवस्थापन अध्यक्ष राजन मडवळ उपाध्यक्षा अंकिता जोशी शिक्षण तज्ञ सूर्यकांत सावंत कुणकेरी शाळा नंबर 3 चे मुख्याध्यापक मिंगेल मान्येकर व बहुसंख्य पालक उपस्थित होते ही नाट्य संकल्पना मुख्याध्यापक विठ्ठल कदम यांची असून वेशाभूषाकार भिवा सावंत हे होते प्रयोग यशस्वी होण्यासाठी रश्मी वाडकर अस्मिता कासार प्रियदर्शनी गावडे किरण तेंडुलकर यांनी प्रयत्न केले
