नागवे सरपंचांसह शिवसैनिकांचा भाजपा प्रवेश

आम.नितेश राणेंचा नागवेत शिवसेनेला धक्का

कणकवली  ता.१९-:* कणकवली तालुक्यातील कणकवली शहरानजीकच्या नागवे गावचे सरपंच नारायण आर्डेकर यांच्यासह प्रमुख शिवसैनिकांनी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भाजपाचे कमळ हाती घेतले. खुद्द सरपंच नारायण आर्डेकर हे भाजपात दाखल झाल्यामुळे आ. नितेश राणे यांनी नागवे गावात सेनेला मोठा धक्का दिल्याचे दिसून येत आहे.

सरपंच नारायण आर्डेकर यांच्यासह शिवसैनिक अमेय आर्डेकर स्वप्नील पाताडे, राकेश सुतार, अभिजित पाताडे, रविकिरण नानचे, गोट्या सुतार, प्रथमेश मोर्ये, प्रतीक बागवे, ओंकार सुतार, रसिक मोर्ये, जयेश आरेकर, महेश आरेकर, प्रकाश सावंत आदींनी भाजपात प्रवेश केला. यावेळी माजी जि.प.अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष गणेश तळगावकर,फोंडाघाट सरपंचसंतोष आग्रे,महेंद्र कुडाळकर, सचिन खेडेकर, सिद्धार्थ जाधव,विजय मेस्त्री आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page