कुडाळ : तालुक्यातील चेंदवण मळेवाडी येथील रस्त्या लगत असलेली विहीर अतिवृष्टीमुळे कोसळली. याची पाहणी कुडाळ सभापती मिलिंद नाईक, शिवसेना उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक आणि इतरांनी केली.
चेंदवण मळेवाडी येथील रस्त्यालगत असलेली विहीर अतिवृष्टीमुळे कोसळली. त्यामुळे तेथील ग्रामस्थ व शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी धोका निर्माण झाला त्याची पाहणी करण्यासाठी कुडाळ सभापती मिलिंद नाईक, शिवसेना उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक, माजी उपसरपंच रश्मी देवेंद्र नाईक, ग्रा. प. सदस्य सायली नाईक, शाखाप्रमुख तुषार नाईक उपस्थित होते. यावेळी संरक्षणभिंत बांधून देण्याचे आश्वासन सभापती मिलिंद नाईक यांनी दिले.
यावेळी स्थानिक ग्रामस्थ तात्या पोयरेकर, गोविंद भरडकर, सागर पोयरेकर, संदीप टुंबरे, संतोष राऊत, रमेश म्हाकले, शंकर म्हाकले, केशव पिळणकर, अनंत पाटील, नितीन पोयरेकर, नारायण तोरस्कर,काशीनाथ तोंडवळकर, सुशिल तोंडवळकर, तुकाराम तोंडवळकर, संजय राऊत आदी उपास्थित होते.
चेंदवण मळेवाडी येथील कोसळलेल्या विहिरीची सभापती मिलिंद नाईक व देवेंद्र नाईक यांनी केली पाहणी
