चोरट्यांचा धुडगूस सुरू; वैभववाडी पाठोपाठ कणकवली तालुक्यात तळेरेत दुकाने फोडली

लागोपाठच्या दुकानफोडयांनी पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

कणकवली ता.१८-:* चोरट्यानी पुन्हा एकदा सिंधुदुर्गात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे.वैभववाडी तालुक्यात रविवारी चोरट्यांनी धुडगूस घातल्यानंतर महामार्गावरील तळेरे बाजारपेठेतील तब्बल 12 हून अधिक दुकाने सोमवारी पहाटे।चोरट्यांनी फोडल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात एका दुकानदाराची तब्बल 4 लाखाहून अधिक कॅश चोरट्यांनी लंपास केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सोमवारी पहाटे तीन ते चारच्या दरम्यान घडली असून यामध्ये कापड दुकान, मोबाईल शॉपी, भुसारी दुकान, मेडिकल, इतर दुकानांचा समावेश दरम्यान आज सकाळी ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ बाजारपेठेतील धाव घेतली.

मात्र चोरट्यांनी अनेक दुकानांच्या गल्ल्यावर डल्ला मारला. चोरट्यांनी रेकी करून ही दुकाने फोडली असण्याची शक्यता आहे. कारण ज्या दुकानांच्या आतील भागात घरे आहेत अशी दुकाने फोडली नसल्याची बाब प्रकर्षाने समोर येत आहे. पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर हे देखील सोमवारी पहाटेपासूनच तरळे येथे दाखल झाले असून, त्यांच्याकडून कसून शोध सुरू आहे. वैभववाडी नंतर कणकवली त्यापाठोपाठ आता तरळे मध्ये देखील चोरट्यांनी दुकाने फोडल्याने पोलिसांसमोर आता तपासाचे आव्हान निर्माण झाले आहे. घटनेची माहिती समजताच येथील व्यापाऱ्यांनी गर्दी केली होती.

मात्र खुलेआमपणे चोरट्यांचा वावर सुरू असताना पोलिसांकडून आता ठोस उपाय योजना आखण्याची गरज निर्माण झाली आहे. बाजारपेठेमध्ये सीसीटीव्ही द्वारे चोरट्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी दिली. पहाटे तीन ते साडेचार या वेळेत बुरखाधारी चोरटे सीसीटीव्हीत कैद झाल्याचे समोर आले आहे. मात्र आता पुढील चोर्‍या टाळण्यासाठी या चोरट्यांना गजाआड करण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर असणार आहे.प्राथमिक शिक्षक राजु बिरादार यांची मोटारसायकलही या चोरट्यांनी लंपास केली आहे.

चोरट्यांनी सध्या जिल्ह्यातील बाजारपेठांना टार्गेट केले असून याबाबत तळेरे व्यापारी संघटना अध्यक्ष तथा सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघटनेचे पदाधिकारी राजू जठार यांनी जिल्ह्यातील सर्व बाजारपेठेना पोलीस संरक्षण देण्याची आग्रही मागणी केली आहे . तळेरेत आज झालेल्या चोरीत सुमारे ४.५लाखा पेक्षा अधिक रु रोख रक्कम व एक मोटरसायकल चोरीला गेली आहे. याबाबत कणकवली पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, ए.पी.आय.-एस. एस.खंडागळे, हवालदार यू.डी.वंजारे, पोलीस नाईक के.पी.कदम अधिक तपास करीत आहेत.

You cannot copy content of this page