माजी शिक्षण मंत्री आम. दीपक केसरकर यांनी दिल्या मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…

मुंबई : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी भेट घेऊन शुभेच्छा देत अभीष्टचिंतन केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर हे देखील उपस्थित होते.मंत्री नितेश राणे यांचा सोमवार २३ जून रोजी वाढदिवस असून ते…

Read More

सावंतवाडी नं दोन शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा…

सावंतवाडी (प्रतिनिधी): कै सौ सुधाताई वामनराव कामत विद्यामंदिर शाळा, सावंतवाडी नं. २ येथे आज, २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. योगशिक्षक श्री विकास गोवेकर यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. त्यानंतर योग प्रशिक्षक श्री गोवेकर यांनी विद्यार्थ्यांकडून विविध योगासनांची प्रात्यक्षिके करून घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांना प्राणायाम आणि त्याचे…

Read More

बांदा श्री विठ्ठल मंदिरात 28 जुनपासून वीणा सप्ताह…

⚡बांदा ता.२२-:बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षावप्रमाणे यंदाही हरिनाम वीणा सप्ताहाला शनिवार दि. २८जुन पासुन प्रारंभ होत आहे.या सप्ताहानिमित्त मंदिरात सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. ५ जुलै रोजी सप्ताहाची सांगता होणार असून रविवार दि. ६ जुलै रोजी आषाढी एकादशीचा भव्य सोहळा होणार आहे. या वीणा सप्ताहाच्या नियोजनासाठी ज्येष्ठ भजनकर्मी…

Read More

चौकुळ गावातील ‘माझी सैनिक’ इमारतीचे छप्पर वादळात गेले उडून…

गावकऱ्यांची स्वातंत्र्य दिनापूर्वी दुरुस्तीची मागणी.. ⚡आंबोली ता.२२-:चौकुळ गावातील अभिमान असलेली ‘माझी सैनिक’ ही इमारत अलीकडील जोरदार वादळ व वाऱ्यामुळे मोठ्या नुकसानीस सामोरी गेली आहे. देशासाठी जीव ओवाळून टाकणाऱ्या माजी सैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या या इमारतीचे छप्पर पूर्णपणे उडून गेले असून, त्यामुळे गावकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. ही इमारत चौकुळ गावाच्या शौर्याची व देशभक्तीची जिवंत साक्ष होती….

Read More

पालकमंत्री नितेश राणे यांनी वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला प्रतिसाद…

रक्तदान शिबिरात ८१ रक्तदात्यांनी केले रक्तदान:भाजपच्यावतीने सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या उपक्रमाचे आयोजन.. ⚡कणकवली ता.२२-: मत्स्य व बंदरे विकास मंत्री, पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका आणि कणकवली शहर भाजपाच्या वतीने कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रविवार २२ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचे उदघाटन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले….

Read More

आनंद जाधव यांचे काल रात्री अल्प आजाराने निधन…!

⚡सावंतवाडी ता.२२-: जिमखाना मैदान भटवाडी येथील रहिवासी आनंद आत्माराम जाधव वय वर्ष 40 यांचे काल रात्री अल्प आजाराने निधन झाले. कट्टर राणे समर्थ म्हणून सावंतवाडी शहरामध्ये त्यांची ओळख होती. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांचे ते चुलत भाऊ होते. त्यांच्या पश्चात आई व त्यांचा एक मोठा परिवार आहे. आज दुपारी बारा वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार…

Read More

गोवा मुक्तिसंग्रामात बांदावासियांचे योगदान अविस्मरणीय…

उमेश गाड यांची भावना.. ⚡बांदा ता.२२-: गोव्याच्या मुक्तिसंग्रामात बांदावासियांचे अतुल्य योगदान आहे. गोमंतकीय जनता हे योगदान कधीही विसरू शकत नाही. माझ्या स्वर्गीय वडिलांसोबत त्याकाळी बांद्यातील जनता खांद्याला खांदा लावून लढली. त्यामुळे बांद्यातील माझा सत्कार हा विशेष असल्याचे भावोद्गार कडशी-मोपा (गोवा) येथील उमेश गार्ड यांनी काढले.स्वातंत्र्यसैनिक (कै.) शंकर गाड यांच्या पश्चात उमेश गाड यांना गोवा शासनाने…

Read More

संत निरंकारी मिशनतर्फे जिल्ह्यात पाच ठिकाणी योग शिबिर ..

वेंगुर्ला प्रतिनिधी- संत निरंकारी मिशन तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून सिधुदुर्ग जिल्ह्यातील ओरोस, माजगांव, कणकवली, देवगड आणि वेंगुर्ला येथे एकाचवेळी पाच ठिकाणी योग शिबिर घेण्यात आले. सर्वच ठिकाणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. फोटोओळी-संत निरंकारी मिशनच्या योग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Read More

नारिंग्रे अपघातात चार तरुणांचा मृत्यू; माजी आमदार वैभव नाईक यांची अंत्ययात्रेत उपस्थिती…

⚡मालवण ता.२१-: नारिंग्रे येथे एसटी आणि रिक्षा यांच्यात झालेल्या दुर्दैवी अपघातात आचरा येथील संकेत सदानंद घाडी, संतोष रामजी गावकर,सुनील सूर्यकांत कोळंबकर आणि रोहन मोहन नाईक या चार तरुणांचे दुःखद निधन झाले आहे. या दुर्दैवी घटनेबाबत माजी आमदार वैभव नाईक यांनी शोक व्यक्त करत आज तरुणांच्या अंत्ययात्रेत ते सहभागी झाले. तसेच कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करत…

Read More

कट्टा येथील आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…!

⚡मालवण ता.२१-:युवा सामाजिक कार्यकर्ते, आभाळमाया ग्रुपचे संस्थापक राकेश डगरे यांच्या वाढदिवसानिमित्त कट्टा येथील स्मिता कंप्युटर इन्स्टिट्युटच्यावतीने कट्टा येथे आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात कट्टा परिसरातील १०१ गरजू लोकांची रक्त तपासणी, थायरॉईड, कॅल्शियम, हिमोग्लोबीन, सीबीसी, डायबेटिस, थायरॉईड फंक्शन टेस्ट करण्यात आल्या. तर २५ जणांनी इसीजी रिपोर्टचा लाभ घेतला. या शिबिराचे उदघाट्न कट्टा…

Read More
You cannot copy content of this page