२३ ते २६ जानेवारी रोजी होणार विजयापुरम पराक्रम दिवस समारंभ..
⚡सावंतवाडी ता.२२-: “नेताजी सुभाषचंद्र बोस”यांच्या
यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त ,२३ ते २६ जानेवारी रोजी अंदमान व निकोबार बेटांवर श्री विजयापुरम येथे पराक्रम दिवस साजरा होणार असून,या समारंभासाठी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात भरीव असे योगदान असलेले सुरेंद्र भोसले यांना खास आमंत्रित करण्यात आले आहे.सुरेंद्र भोसले यांना उपस्थित राहण्यासाठी भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाने निमंत्रण दिले आहे.
भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि मार्गदर्शित करणार आहेत.
सुरेंद्र भोसले हे आझाद हिंद सेनेचे सेनाप्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री जनरल जगन्नाथराव भोसले यांचे यांचे सख्खे भाऊ श्रीमंत लक्ष्मणराव भोसले यांचे
नातू आहेत.
सुरेंद्र भोसले हे आझाद हिंद सेना परिषदांच्या विविध उपक्रमांमध्ये सहभागी आहेत. ते महाराष्ट्र INA Council चे अध्यक्ष देखील आहेत.
