⚡वेंगुर्ला ता.२१-: वेंगुर्ला तालुक्यातील 5 जिल्हा परिषद मतदारसंघासाठी आज बुधवारी 21 जानेवारी 2026 रोजी पर्यंत एकूण 37 उमेदवारी अर्ज तर 10 पंचायत समिती मतदारसंघांसाठी एकूण 62 उमेदवारी अर्ज असे एकूण 99 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिली. यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी हेमंत किरुळकर उपस्थित होते.
यामध्ये पंचायत समितीनिहाय दाखल अर्ज : म्हापण 11, परुळे 9, आडेली 10, वायंगणी 7, तुळस 4, मातोंड 8, उभादांडा 2, आसोली 4,रेडी 3 व शिरोडा 4 असे एकूण 62 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.तर जिल्हा परिषदनिहाय दाखल अर्ज : म्हापण 6, आडेली 13, तुळस 6, उभादांडा 3 व रेडी 9 असे एकूण 37 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
भाजपामार्फत जिल्हा परिषद साठी श्री. मनीष प्रकाश दळवी (आडेली ), मनवेल गिरगोल फर्नांडिस ( उभादांडा ), प्रितेश शंकर राऊळ ( रेडी ) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर पंचायत समितीसाठी निलेश दत्तात्रय सामंत, गुरुनाथ मडवळ, आपी फणसेकर, प्रियांका घाटवळ, संकेत संदीप धुरी, शंकर शशिकांत घारे, सौ. राऊत इत्यादीनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
शिवसेनेतर्फे जिल्हा परिषद साठी योगिता यशवंत परब ( तुळस ) व यज्ञा देवदत्त साळगावकर ( म्हापण ) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर पंचायत समितीसाठी सुचिता दत्तात्रय वजराटकर ( तुळस ), उमेश प्रकाश नाईक ( आडेली ), शीतल राजेश साळगावकर ( शिरोडा ), सचिन दामोदर देसाई ( परुळे ), साक्षी शैलेश नार्वेकर ( उभादांडा) इत्यादीनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
ठाकरे शिवसेनेतर्फे जिल्हा परिषद साठी संजय दत्ताराम गावडे ( उभादांडा ), विजय वासुदेव नाईक ( आडेली ), सौ. आरमारकर ( तुळस ), नामदेव राणे ( रेडी ), सौ. पाटकर ( म्हापण ) इत्यादीनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर पंचायत समितीसाठी नित्यानंद शेणई ( आडेली ), सौ. माडकर ( वायंगणी), श्री. कोंडये, संदीप पेडणेकर ( मातोंड), समृद्धी कुडव ( शिरोडा ), वंदना कांबळी ( रेडी ) यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसकडून ललितकुमार ठाकूर ( आडेली ), प्रथमेश परब ( रेडी ) यांनी अर्ज दाखल केले आहेत. तर अपक्ष म्हणून काही उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये सुजाता पडवळ (तुळस), नितीन रामचंद्र मांजरेकर ( आडेली पं. स.), सिद्धेश विजय परब ( रेडी जि. प.), योगिता सिद्धेश परब (शिरोडा पं. स.) जनार्दन उर्फ समीर कुडाळकर ( आडेली जि. प. व पं. स.), समिधा जनार्दन कुडाळकर ( आडेली पं. स.), सखाराम उर्फ दादा सारंग ( आडेली जि. प. रा. कॉ.), चंद्रहास उमेश पांडजी ( रेडी जि. प. अपक्ष), काशिनाथ नार्वेकर ( रेडी जि. प.) सुभाष बोवलेकर, नयना धुरी, सुनील मोरजकर, तांडेल, मितेश परब व अन्य उमेदवार यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, अशी माहिती संबंधित पक्षप्रमुख पदाधिकारी यांनी दिली. या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेवेळी सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत उमेदवाराची गर्दी झाली होती. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्न| उर्फ बाळू देसाई, वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, रमेश नार्वेकर,मच्छिमार नेते दादा केळुस्कर, वसंत तांडेल, सौरभ नाईक, माजी शिक्षण व आरोग्य सभापती निलेश सामंत,भाजपाचे प्रसाद पाटकर, योगेश प्रभूखानोलकर, हितेश धुरी, तुषार साळगावकर, माजी नगरसेविका साक्षी पेडणेकर, नगरसेवक प्रणव वायंगणकर, सुधीर पालयेकर, बाळा दळवी, वेंगुर्ला तालुका खरेदी विक्री संघांचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, माजी नगराध्यक्ष सुनील डूबळे, संदीप पेडणेकर, पंकज शिरसाट, सुजाता देसाई, मठ सरपंच रुपाली नाईक, खानोली सरपंच सुभाष खानोलकर, आनंद गावडे, दाभोली सरपंच उदय गोवेकर, रेडी सरपंच रामसिंग राणे, आरवली सरपंच समीर कांबळी, अण्णा वजराटकर, वाल्मिकी कुबल, माजी सभापती जयप्रकाश चमणकर, दिपक नाईक, माजी जि. प. महिला व बालकल्याण सभापती मनीषा ठाकूर, राजू ठाकूर, महेश धुरी, अनिल नाईक,ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख व उभादांडा सरपंच निलेश चमणकर, कार्मिस आल्मेडा, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष योगेश कुबल, माजी सभापती यशवंत उर्फ बाळू परब, नगरसेवक दाजी परब, प्रशांत आपटे व अन्य, शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर, शिरोडा उपसरपंच चंदन हाडकी, माजी उपसरपंच राहुल गावडे, कौशिक परब, स्नेहा साळगावकर, प्रदीप प्रभू, पेंडुर सरपंच संतोष गावडे, पाल शक्तिकेंद्र प्रमुख कमलेश गावडे, साईप्रसाद नाईक, महेश प्रभूखानोलकर, प्रशांत प्रभूखानोलकर, प्रशांत नाईक, विजय रेडकर, कोचरा सरपंच योगेश तेली, राजू सामंत, पप्पू धर्णे, श्री. सामंत, समीर गडेकर, जीवन कुडाळकर, वजराट माजी सरपंच सूर्यकांत परब, मंगेश परब, वायंगणी माजी सरपंच सुमन कामत, सुधीर धुरी, पालकरवाडी सरपंच बंड्या पाटील, सूर्याजी नाईक आदिसह नागरिक तहसील कार्यालय येथे बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी व उपनिरीक्षक योगेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात होता. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नायब तहसीलदार राजन गवस व गटविकास अधिकारी दिनेश पाटकर व प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या योग्य नियोजनात निवडणूक अर्ज दाखल प्रक्रिया सुरळीत पार पडली. उद्या गुरुवारी सकाळी 11 वा. पासून तहसील कार्यालय येथे गणनुसार छाननि प्रक्रिया होणार आहे.
वेंगुर्ला तालुक्यात जि.प.साठी ३७, पं.स.साठी ६२ अर्ज…
