न्हावेली येथील श्री गणपती मंदिरात २२ रोजी माघी गणेश जयंती उत्सव…

सावंतवाडी ता.२१-: न्हावेली ( विवरवाडी ) येथील श्री देव गणपती मंदिरात २२ जानेवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सव साजरी होणार असून, सकाळी ९:०० वाजता अभिषेक,सकाळी १०:०० वाजता सत्यविनायक महापूजा, दुपारी १२:३० महाआरती,महाप्रसाद, सायंकाळी ६:३० वाजता भजनाचा कार्यक्रम, रात्रौ ९:०० वाजता श्री वासुदेवानंद सरस्वती दशावतार नाट्य मंडळ माणगाव (कुडाळ) यांचा “मुक्त झाली गंधर्व कन्या”हा दशावतार नाट्य प्रयोग होणार असून,या कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री देव गणपती मंदिर सेवा समिती , न्हावेली विवरवाडी ग्रामस्थांनी केले आहे.

You cannot copy content of this page