बांदा पंचायत समितीसाठी शहर विकास आघाडीकडून सौ. ऋतिका संदेश नाईक यांचा उमेदवारी अर्ज दाखल…

⚡बांदा ता.२१-: बांदा पंचायत समिती निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून सौ. ऋतिका संदेश नाईक यांनी आज अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर यांच्यासह राजदीप पावसकर, ओंकार नाडकर्णी, गिरीश भोगले, संदेश नाईक आदी उपस्थित होते.
बांदा येथे सध्या भाजपची सत्ता असून पंचायत समितीची ही जागा महिला खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने मराठा समाजातील उमेदवार देत निवडणूक रिंगणात उतरत राजकीय चुरस निर्माण केली आहे. सौ. ऋतिका नाईक यांच्या उमेदवारीमुळे येत्या निवडणुकीत लढत अधिक रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसत आहे. सौ नाईक यांच्या विरोधात महायुतीच्या उमेदवार सौ रुपाली शिरसाट यांचे आव्हान आहे.

You cannot copy content of this page