मालवण तालुक्यात मनसे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर
⚡मालवण ता.०६-:मालवण तालुक्यातील मनसे पदाधिकारी यांच्या रिक्त जागांवरील नियुक्त्या तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी जाहीर केल्या आहेत. यामध्ये प्रशांत पराडकर तालुका उपाध्यक्ष (देवबाग आचरा विभाग), संकेत वाईरकर तालुका उपाध्यक्ष (मालवण शहर), कोळंब मनसे शाखाध्यक्ष पदी गणेश कांदळगावकर, उपाध्यक्ष पदी साईल पराडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनसे मालवण तालुका बैठकीत या नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या…
