मालवण तालुक्यात मनसे पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

⚡मालवण ता.०६-:
मालवण तालुक्यातील मनसे पदाधिकारी यांच्या रिक्त जागांवरील नियुक्त्या तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी जाहीर केल्या आहेत. यामध्ये प्रशांत पराडकर तालुका उपाध्यक्ष (देवबाग आचरा विभाग), संकेत वाईरकर तालुका उपाध्यक्ष (मालवण शहर), कोळंब मनसे शाखाध्यक्ष पदी गणेश कांदळगावकर, उपाध्यक्ष पदी साईल पराडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मनसे मालवण तालुका बैठकीत या नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यावेळी विनोद सांडव, सचिव विल्सन गिरकर, उदय गावडे, गणेश गावडे, भारती वाघ, विशाल ओटणेकर, संदीप लाड, लौकिक अंधारी, वैभव आजगावकर आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

कोळंब येथील ग्रामस्थांचा मनसेत प्रवेश

कोळंब येथे मनसेची शाखा स्थापन करण्यात आली. कोळंब मनसे शाखाध्यक्ष पदी गणेश कांदळगावकर, उपाध्यक्ष पदी साईल पराडकर यांची निवड करण्यात आली. कांदळगावकर, पराडकर यांच्यासह कोळंब व परिसरातून प्रवेशकर्ते चिन्मय पराडकर, मंदार हिंदळेकर, बाबा कोयंडे, दशरथ मणचेकर, विक्रांत नाईक, जयेश पराडकर, चिन्मय शेलटकर, सार्थक वायंगणकर, संकीत शेलटकर आदीनी मनसेत प्रवेश केला, अशी माहिती तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page