मळगाव येथे उभारण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ मुर्तीचे पुजन संपन्न

भिल्लवाडी ग्रुपच्या विशेष प्रयत्नाने मळगाव गावच्या शिरपेचात आणखी भर*

⚡सावंतवाडी ता.०६सहदेव राऊळ -: भिल्लवाडी ग्रुप मळगाव यांच्यावतीने मळगाव ग्रामपंचायतीच्या परवानगीने तसेच समस्त मळगाव ग्रामस्थांच्या पाठिंब्याने उभारण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन बुधवारी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या उत्साहात करण्यात आले. भिल्लवाडी ग्रुपच्या या प्रयत्नाने मळगाव गावच्या शिरपेचात आणखी भर पडली आहे.

पूजनावेळी प्रमुख पाहुणे सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य आना गावकर, भिल्लवाडी ग्रुपचे अध्यक्ष पांडुरंग राऊळ, उपाध्यक्ष सचिन राऊळ, चेअरमन शिवराम राऊळ, खजिनदार गोट्या राऊळ, पम्या राऊळ, पिंटू राऊळ, महेश राऊळ, प्रथमेश राऊळ, मयूर गावकर, निखिल राऊळ, नाना राऊळ व इतर सदस्य सुनील सावळ, समाजसेवक राजू परब, उदय सावळ, काका गावकर, परशुराम राऊळ, निलेश राऊळ, बाबल सावळ व इतर उपस्थित होते.
मळगाव चौकी अर्थात तिठा येथे दीड महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची अश्वारुढ मूर्ती मळगाव येथील भिल्लवाडी ग्रुपच्यावतीने उभारण्यात आली होती. त्यामुळे मळगावच्या सौंदर्यात भर पडल्याची चर्चा मळगाव पंचक्रोशीत सुरु होती. आता या मुर्तीचे पुजन झाल्याने मळगाव गावच्या धार्मिक स्थळांप्रमाणेच आता मळगाव येथील ऐतिहासिक स्थळात भर पडली आहे. तर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या स्थापनेने मळगाव गावाच्या शिरपेचात आणखी भर पडली आहे. या ऐतिहासिक स्थळाच्या पुजनसाठी उपस्थित भिल्लवाडी ग्रुप, मळगाव सरपंच, उपसरपंच, सदस्य, समाजसेवक तसेच समस्त मळगाव ग्रामस्थ याचे विशेष सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page